शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

हत्ती पकड मोहीम युध्दपातळीवर

By admin | Updated: December 26, 2014 23:59 IST

उपवनसंरक्षकांची माहिती : दोन हत्तींना आंबेरीत प्रशिक्षण : हत्तिणीची रवानगी तिलारीत

कुडाळ : जिल्ह्यातील माणगाव परिसरातील हत्तींना पकडून प्रशिक्षित बनविण्याच्या मोहिमेच्या पूर्वतयारीची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी आंबेरी येथील हत्ती हटाव कॅम्पच्या ठिकाणी जाऊन केली. यावेळी दोन हत्तींना आंबेरी येथे प्रशिक्षीत करण्यात येणार असून त्यातील हत्तिणीला पकडून तिलारी बॅक वॉटर येथील जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती सावंतवाडीचे उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांनी खासदार राऊत यांना दिली. हत्तींना पकडून प्रशिक्षण माहिमेसंदर्भात कुडाळ येथे बोलाविलेल्या आढावा बैठक संपल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी रानटी हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या आंबेरी येथील कॅम्पच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम तसेच वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी येथे हत्तींना कशाप्रकारे ठेवण्यात येणार, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणारे खाद्य आणले आहे काय? पाणी पुरवठा कसा आहे? योग्य प्रकारे सर्व सोयीसुविधा आहेत की नाहीत, याची पाहणी खासदार राऊ त यांनी केली. आढावा बैठकीच्या वेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येथील क्षेत्र हे हत्तीबाधित करा, असे निवेदन खासदारांना दिले. मात्र, राऊत यांनी, येथील क्षेत्र हे कदापी हत्तीबाधित करायला देणार नसून येथील जनतेची हत्तींपासून सुटका करून या हत्तींना योग्य ठिकाणी नेण्यात येईल, असे सांगितले. ‘त्या’ तिन्ही हत्तींना प्रशिक्षित करा, असा आदेश खासदार राऊत यांनी वनअधिकाऱ्यांना दिला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करा. सर्व काही चांगले होईल. हत्ती पकड मोहिमेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून हवी ती मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तीन टप्प्यात राबविणार मोहीमया मोहिमेत आलेल्या पथकांकडून हत्तींचा शोध घेतला जाईल. योग्य जागी त्यांना बेशुध्द करण्याची लस देण्यात येईल. बेशुध्द झालेल्या हत्तींना प्रशिक्षित हत्तींच्या साहय्याने आंबेरी येथील कॅम्पच्या ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर तेथे फक्त दोन हत्तींना ठेवण्यात येईल. मोठ्या हत्तिणीला तिलारी हत्ती परिसरात सोडण्यात येईल. दोन हत्तींना ‘कुणकी’ हत्ती प्रशिक्षण देऊन माणसाळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. हत्ती माणसाळल्यानंतर त्यांना येथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येईल. कमी वेळेत मोहीम राबवाकमीत कमी वेळेत मोहीम राबवा. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने त्या अगोदरच हत्तींना प्रशिक्षित करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.