शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

निवडणुकीचे नागरिकांना कुतूहल

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

वैभववाडी-वाभवे नगरपंचायत : अत्यल्प मतदानामुळे प्रत्येक मत ठरणार निर्णायक

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीच्या निमित्ताने येथील नागरिकांना कुतूहल आहे. आकाराने आणि लोकसंख्येनेही लहान असलेल्या या नगरपंचायतीच्या १७ प्रभागात केवळ १ हजार ४७६ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ११ हा सर्वाधिक १३0 मतदार संख्येचा खुल्या प्रवर्गाचा तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी राखीव असलेला मोठ्या क्षेत्रफळाचा प्रभाग क्रमांक १३ कोंडवाडी परिसर हा फक्त ६२ मतदार संख्येचा सर्वात लहान प्रभाग आहे. १७ पैकी केवळ ३ प्रभागातील मतदारांची संख्या १00 च्या वर आहे.ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले म्हणजे नेमके काय याबाबत निम्म्याहून अधिक मतदारांना कुतूहल आहे. नगरपंचायतीमुळे सुविधा काय आणि कधी मिळतील हे स्पष्ट नसले तरी कर वाढणार या ऐकीव माहितीने सामान्य नागरिक काहिसे शहारले आहेत. दोनशे अडीचशे मीटर लांबीच्या बाजारपेठेत, स्टेट बँक परिसर आणि सज्जनकाका नगर एवढ्याच भागाला शहराचा ‘लूक’ दिसून येतो. त्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीपुढे शहराच्या विकासाचे मोठे आव्हान दिसत आहे.वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रात माईणकरवाडी, तांबेवाडी, गावठण आणि कोंडवाडी या चार वस्त्या वगळता अन्य भागात स्थानिकांपेक्षा नोकरदार, व्यापारी आणि वास्तव्यासाठी आलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे स्थानिकांपेक्षा इतरांचा वरचष्मा येथे दिसून येतो. त्यामुळे पहिल्या निवडणुकीतही स्थानिकांपेक्षा इतरांचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत वेगळी समिकरणे जुळवली जाण्याची चिन्हे आहेत. नगरपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी वरकरणी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्येक राजकीय पक्षांचे सत्तेचे इरादे आणि पहिल्यांदा नगरसेवक होण्यासाठी अनेकांच्या असलेल्या आकांक्षाना आवर कोणी घालायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही आरक्षित जागांवरील निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसाधारण स्त्री आणि खुल्या जागांच्या प्रभागांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बहुतांश बाहुबली एक, पाच आणि अकरा यातीन प्रभागात तुटून पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)‘गाव विकास आघाडी’ बाबत चर्चेची गुऱ्हाळेआमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी त्यांनी जूनपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआय अशी महायुती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असे सेना, भाजपकडून सांगितले जात असले तरी आरपीआय कडून अद्याप तसे कोणतेही सुतोवाच नाहीत. शिवाय ‘गाव आघाडी’ करण्याच्या उद्देशाने स्थानिकांमध्ये चर्चेची गु-हाळे सुरू आहेत.साठीतले उत्सुकनगरसेवक म्हटले की नजरेसमोर छबी उभी राहते ती पन्नाशीच्या आतील तरुण रक्ताची. मात्र, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत नशीब अजमावून नगरसेवक बिरुद मिळविण्यासाठी वयाच्या साठीत पोहोचलेले सात-आठ जण निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यातही काहीजण पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. या साठीतल्या उत्सुकांना कोण कसा आणि किती प्रतिसाद देतो यावर सर्व अवलंबून आहे.८३ मतदार वाढलेवाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची घोषणा झाली. तेव्हा मतदार संख्या १ हजार ३९३ एवढी होती. त्यामध्ये ८३ मतदारांची वाढ होऊन वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ४७६ मतदारांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. या यामध्येच ७४३ पुरुष व ७३३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या १0 ने कमी आहे.