शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:23 IST

कणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे मतदान १४ आॅक्टोबरला; आचारसंहिता सुरू, सर्वच राजकीय पक्ष लागले तयारीला

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : जिल्ह्यातील ४२९ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १४ आॅक्टोबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठीची आचारसंहिता शुक्रवार (दि. १ सप्टेंबर) पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळात दिनांक २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने गावागावांतील चांगला चेहरा समोर आणण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ३२५, तर जानेवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया १५ ग्रामपंचायती आहेत. सध्या डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम आणि निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलबजावणी शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू केली आहे.मोर्चेबांधणीला वेगजिल्ह्यातील एकूण ४२९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३२५ एवढ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यासाठीची आचारसंहिताही संबंधित ग्रामपंचायत परिसरात लागू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात राहाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडायचा असल्याने सरपंच पदासाठी योग्य अशा उमेदवाराचा शोध सर्वच पक्षांना घ्यावा लागणार आहे.निवडणूक कार्यक्रम१४ सप्टेंबरला तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक २२ ते २९ सप्टेंबर, अर्जांची छाननी ३ आॅक्टोबर सकाळी ११ वाजल्यापासून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिम निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी जाहीर करणे व निवडणूक चिन्ह देणे ५ आॅक्टोबर दुपारी ३ वाजल्यानंतर, मतदान १४ आॅक्टोबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत, मतमोजणी १६ आॅक्टोबर आणि निवडणूक निकाल जाहीर करण्याचा अंतिम दिनांक १७ आॅक्टोबर असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.तालुकानिहाय निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीवेंगुर्ला तालुक्यात २३, कुडाळ ५४, सावंतवाडी ५२, दोडामार्ग २८, वैभववाडी १७, कणकवली ५८, देवगड ३८, मालवण ५५ अशा ३२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.