शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रश्न बेदखल

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

वसंत सरवणकर : देवगड पंचायत समिती सभा

पुरळ : खातेप्रमुख सभेला उपस्थित राहत नाही, अशी तक्रार वरिष्ठांकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यांची तक्रार लोकायुक्तांकडे करावी, अशी सूचना वसंत सरवणकर यांनी देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये लावून धरत मागील सभेच्या अनेक प्रश्नांची पूर्तता न झाल्याने खेद व्यक्त केला.देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी किसान भवन सभागृहात सभापती डॉ. मनोज सारंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यामध्ये बनावट किटकनाशकांची विक्री केली जात आहे, असा प्रश्न माजी सभापती सरवणकर यांनी केला होता. या प्रश्नाची पुनरावृत्ती सरवणकर यांनी केली. यावेळी पंचायत समिती कृषी विभागाने सांगितले की, आम्हाला एकही बनावट औषध मिळालेले नाही. आमचा विक्रेत्यांवर लक्ष आहे. या उत्तरावर सरवणकर यांनी नाराजी व्यक्त करीत बनावट औषध खुलेआमपणे विक्री केली जाते याची चौकशी करा, असे सुचविले.देवगड पंचायत समितीच्या दिवसभर चाललेल्या मासिक सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वेळेत मिळण्यासाठी व देवगड प्रादेशिक नळयोजनेवरील अनधिकृत नळ जोडणीधारकांवर कारवाई करावी व शिरगावमधील पाण्याचे नियोजन करावे, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली सभा सायंकाळी ६ वाजता संपली. अनेक विषयांवर चर्चा करून सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सभेच्या सुरूवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वेळेत मिळत नसल्यावरून रवींद्र जोगल यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यावर यापुढे इतिवृत्त सभागृहात न देता सभेपूर्वी दहा दिवस अगोदर देण्यात येईल, असे सभापतींनी सांगितले. इळये पाटथर येथील दलित वस्तीतील रस्ता करणे या ६ लाखांच्या कामावर केवळ ६० हजार रूपये खर्च झाले. याची चौकशी करण्याची मागणी मागील बैठकीत मनस्वी घारे यांनी केली होती. या बैठकीत घारे यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केल्यावर अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता मोहिते यांनी दिले. (वार्ताहर) पाणी चोरीवरून अनेक प्रश्न उपस्थितनळयोजनेवरून पाणी चोरीचा विषय सभागृहात सदस्यांनी उचलून धरला. मात्र, पाणी चोरी होत नाही असाच अहवाल पाणीपुरवठा विभागामार्फत प्राप्त झाला असल्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. रवींद्र जोगल यांनी देवगड नळयोजनेवर २१ अनधिकृत नळजोडण्या असून या जोडण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. शिरगावमध्ये मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे या योजनेवरून देवगड, जामसंडे या गावांना होणारा पाणीपुरवठा नियमित होत नसल्याचे शिरगाव येथील पाणीपुरवठा नियंत्रणात आणावा, अशी मागणी हर्षा ठाकूर यांनी केली. सौंदाळे गावात सरपंचांच्या संगनमताने अनधिकृतरित्या पाण्याचा वापर व अपव्यय होत असून याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सदस्य प्रकाश गुरव यांनी केली.