कुडाळ : कुडाळ एमआयडीसी परिसरात सुमारे आठ फुटी अजगर सापडला असून, सर्पमित्र डॉ. सुधीर राणे यांनी या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. मंगळवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी परिसरात झाडी असलेल्या भागात हा अजगर तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. हा अजगर भक्ष्याच्या शोधात मनुष्यवस्तीच्या नजीक आला असल्याने या अजगराला पकडण्यासाठी पिंगुळी येथील सर्पमित्र डॉ. सुधीर राणे यांना बोलाविण्यात आले. डॉ. राणे यांनी या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)
कुडाळात आठ फुटी अजगर सापडला
By admin | Updated: September 10, 2015 00:43 IST