शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिस वसाहत आठ दिवसानंतरही ‘तहानलेली’

By admin | Updated: October 26, 2016 00:17 IST

पोलिस कुटुंबियांची पालिकेवर धडक : पाणीपुरवठाप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

मालवण : मालवण पोलिस वसाहतीत गेले आठ दिवस पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे संतप्त बनलेल्या पोलिस कुटुंबियांनी मंगळवारी थेट मालवण पालिकेवर धडक दिली. प्रशासनाने पोलिस कुटुंबियांची होणारी गैरसोय जाणून ‘पाणी’ प्रश्न कायस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे यांनी पोलिस वसाहतीला आजपासून अग्मिशमन बंब व विद्युत जनित्राच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे सांगितले. मालवण पालिकेत महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कुटुंबियांनी बंद पाणी पुरवठ्याचा पाढा वाचला. यापूर्वी होत असलेला पाणीपुरवठा अनेक वेळा गढूळ व जंतूयुक्त होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष घालून प्रश्न सोडवावा. पाणी पुरवठा गेला आठवडाभर बंद असल्याने पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली आहे. सकाळच्या वेळी पालिकेकडून टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठाही वसाहतीपासून लांब असल्याने इतर घरगुती कामांवरही ताण पडत असल्याचे पोलिस कुटुंबियांनी सांगितले. यावेळी पालिकेत नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ममता वराडकर, मोहन वराडकर आदी उपस्थित होते. तात्पुरता पाणीपुरवठा सुरळीत न करता कायमस्वरूपी उपयोजना करून पोलिसांची ‘तहान’ भागवावी, अशीही मागणी पोलिस कुटुंबियांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालिका मागणार ग्राहक मंचाकडे दाद मालवण नगरपालिकेच्या एका पर्यटन संकुलात वीजचोरी होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने वीज वितरणच्या निदर्शनास आणून दिला होता. त्याप्रकरणी वीज वितरण कंपनीने पालिकेलाच वीजचोरीप्रकरणी १ लाख २६ हजाराचे दंडात्मक बिल सादर केले. हे अवास्तव बिल भरणा न केल्याने वीज वितरणने पाणीपुरवठा खंडित केला असे मुख्याधिकारी गगे यांनी स्पष्ट केले. याबाबत मालवण पालिका प्रशासन ग्राहक मंचाकडे दाद मागणार आहे, असेही गगे यांनी सांगितले.