शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांचा प्रभाव सावंतवाडीपुरता

By admin | Updated: August 3, 2014 23:34 IST

रमेश कदम : कुठे आहे सिंधुदुर्गात दहशतवाद; जिल्ह्यात राष्ट्रवादीवर प्रेम करणारी जनता

सावंतवाडी : शिवसेनेत कोण जाणार आणि कोण नाही, याची खातरजमा ५ आॅगस्टनंतरच होईल. मात्र, आमदार दीपक केसरकरांचा प्रभाव हा सावंतवाडीपुरता असून अन्य तालुक्यात त्याचा परिणाम होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवादच नाही, असे मतही त्यांनी मांडले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पक्ष निरीक्षक बाबाजी जाधव, माजी आमदार शिवराम दळवी, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, अबिद नाईक, उल्हास गावडे, नगरसेवक राजू बेग, सुनिल लिंगवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना कदम म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीवर प्रेम करणारी माणसे आहेत. त्यामुळे पक्ष कोणीही सोडणार नाही. आमदार केसरकर यांनी लोकसभा निवडणुुकीत धनुष्यबाणावर शिक्का मारण्यास सांगितला. त्यावेळी त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. आता यापुढे पक्ष जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.सिंधुदुर्गात आमच्या वाट्याला सावंतवाडी मतदारसंघ आला असून, येथून आम्ही निवडणूक लढवणार आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, त्यावर भाष्य करणार नाही. आमदार केसरकर यांचा प्रभाव सावंतवाडीपुरता आहे. इतर तालुक्यात पक्षाचे सर्व कार्यकर्ते भेटून बाजू मांडत आहेत. त्यांना ताकद देण्याचे काम यापुढे करू. पक्षात राहून कोणीही केसरकरांना मदत करणार नाही, असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत केसरकर यांच्या कोअर कमिटीत असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यापुढे पक्षाच्या सतत बैठका घेऊन पक्षाला ताकद देण्याचे काम केले जाईल. जिल्ह्यात १५ आॅगस्टपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून पक्षाला बळकटी मिळेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)