शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमधील सहाजणांना शिक्षा

By admin | Updated: September 7, 2015 21:42 IST

तहसीलदारांच्या दालनात अनधिकृत प्रवेश प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ येथील तत्कालीन तहसीलदार जयराज देशमुख यांच्या दालनात अनधिकृतरीत्या प्रवेश करून सरकारी कामात अडथळा व धमकी दिल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी आरोपी नित्यानंद तुकाराम शिरसाट याच्यासह सहाजणांना प्रत्येकी एक महिना कारावास व एक हजार रुपयांची शिक्षा दिली आहे. शिक्षा झालेले सर्वजण कुडाळ परिसरातील आहेत. तत्कालीन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जयराज सदाशिव देशमुख यांच्या दालनात संबंधित सहाजणांनी अनधिकृतरीत्या प्रवेश करीत वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध आमच्यावर कारवाई का करता असे सांगून, देशमुख यांच्याशी हुज्जत घातली होती. अरेरावी करीत गोंधळ निर्माण केला होता. यापुढे आमच्यावर कारवाई केली तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली होती. हा प्रकार २६ नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता घडला होता. याप्रकरणी ४ डिसेंबर २०१३ रोजी देशमुख यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बेकायदेशीर जमाव करणे, लोकसेवकाला अटकाव करणे, अनधिकृतपणे घुसणे, धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांन्वये आरोपी नित्यानंद शिरसाट (वय ३७), महेश तुकाराम शिरसाट (३५), नितीन रत्नाकर सावंत (३६), संदीप आत्माराम राऊळ (४७), संदेश अरविंद शिरसाट (३५), विजय सुरेश प्रभू (३५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याच्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांनी वरील सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हा निकाल ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी देण्यात आला होता. दरम्यान, या निकालाविरोधात जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयात २२ जानेवारी २०१५ रोजी अपील दाखल केले होते. या अपिलावर झालेल्या सुनावणीत वरील सहाही आरोपींना विविध कलमांखाली एक महिना कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वरील शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश देण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता अवधूत भणगे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)जामीन मंजूरदरम्यान, उच्च न्यायालयात जाण्यासाठी जामिनाची विनंती करण्यात आली होती. ती मान्य करीत न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला.