शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी धारेवर

By admin | Updated: June 5, 2014 00:38 IST

सतीश सावंत : विद्यार्थ्यांना रंगीत गणवेश मिळालेच पाहिजेत

सिंधुदुर्गनगरी : शालेय गणवेशाचा रंग बदलण्याचा ठराव घेऊन तब्बल दोन वर्षे लोटली तरी याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. या वृत्ताची दखल घेत या शैक्षणिक वर्षातच विद्यार्थ्यांना आकर्षक रंगाचे गणवेश मिळालेच पाहिजे, असा पवित्रा जि.प. सदस्य सतीश सावंत यांनी घेत शिक्षणाधिकार्‍यांना धारेवर धरले. यावेळी शिक्षणाधिकार्‍यांनी यासाठी खास अधिकार्‍यांची नियुक्तीही केली आहे. गणवेशाचा रंग निश्चितीसाठी १२ रोजी खास शिक्षण समिती सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना आकर्षक गणवेश मिळणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाचा पारंपरिक रंग बदलून आकर्षक रंगातील गणवेश पुरविण्याचा दोन वर्षांपूर्वी शिक्षण समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाकडून सदस्यांच्या या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावणार्‍या प्रशासनासह सदस्यांना जाग येण्यासाठी ‘लोकमत’ने गणवेश रंग बदलाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल आजच्या समिती सभेत घेण्यात आली. गणवेश रंगाबाबत चर्चा करताना सदस्य सतीश सावंत यांनी शिक्षणाधिकारी धाकोरकर यांना धारेवर धरले. मात्र धाकोरकर यांनी, आता वेळ निघून गेली, असे म्हणत गणवेशाचा रंग बदलणे शक्य नसल्याचे सांगितले. या शिक्षणाधिकार्‍यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत सदस्य आक्रमक बनले. गणवेशाचा रंग बदलायला दोन वर्षे लागतात का? गतवर्षी उशीर झाला असेल मात्र यावर्षी गणवेशाचा रंग बदलला पाहिजे, याबाबत तत्काळ कार्यवाही करा. आठ दिवसात विविध रंगाच्या गणवेशाचे नमुने सादर करा. यावेळी कणकवली, कुडाळ, दोडामार्ग व सावंतवाडी या चार गटशिक्षणाधिकार्‍यांची नेमणूक करून त्यांच्याकडे गणवेशाचा रंग बदलाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी सदस्यांनी १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजता गणवेशाचा रंग निश्चित करण्यासाठी खास शिक्षण समिती सभा लावली असून यावेळी रंगसंगती निश्चित करण्यात येणार आहे. गणवेश रंग बदलाच्या विषयावरून सदस्य व अधिकारी यांच्यात वादळी चर्चा झाली. अखेर खूप वेळ रंगलेल्या चर्चेअंती आता विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून आकर्षक रंगाचा गणवेश मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)