शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

शिक्षण विभागाला गवंडींचा विसर

By admin | Updated: June 29, 2015 00:33 IST

शिक्षण विभागाकडून पेन्शन केसबाबतचा प्रस्तावच जिल्हा परिषद रत्नागिरीकडे पाठविला गेला नसल्याने गवंडी यांच्या कुटुंबियांची परवड होताना दिसत आहे.

देवरूख : शिक्षकी पेशात काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील शिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच सुभाष गवंडी यांचाच संगमेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला विसर पडला आहे. शिक्षण विभागाकडून पेन्शन केसबाबतचा प्रस्तावच जिल्हा परिषद रत्नागिरीकडे पाठविला गेला नसल्याने गवंडी यांच्या कुटुंबियांची परवड होताना दिसत आहे. याकडे शिक्षण विभाग गांभीर्याने लक्ष देईल का? असा आर्त सवाल कुटुंबियांनी केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी शिक्षक, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच गवंडी यांच्या निधनानंतर पेन्शन मिळावी, यासाठीची कागदपत्र पत्नीने पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सादर केली. पेन्शनबाबतची कागदपत्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात न आल्याने पंचायत समिती कार्यालयात धूळ खात पडली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गवंडी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक त्याचबरोबर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच होते. गवंडी हे पाटगावचे रहिवासी होते. अल्पशा आजाराने त्यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. गवंडी यांच्या निधनानंतर ४ मेच्या दरम्यान त्यांच्या पत्नीने पेन्शन मिळावी, यासाठी संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. यासंदर्भात गवंडी यांनी पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली असता, पेन्शन केस व कागदपत्र आजतागायत जिल्हा परिषद, रत्नागिरीकडे मंजुरीसाठी पाठवलेली नसल्याचे म्हणणे आहे. येथील पंचायत समितीत असणाऱ्या अधिकारीवर्गाच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही पेन्शन केस व सेवापुस्तक पंचायत समिती कार्यालयात ठेण्याचा नेमका हेतू काय? असा सवाल उमटत आहे.गवंडी यांचे दोन लहान मुलगे असून, शिक्षण घेत आहेत. सुभाष गवंडी यांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी गवंडी यांच्या पत्नीवर येऊन पडली आहे. याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)