शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गणेश उत्सवापुर्वी कोकणातील वीज वितरण सुरळीत करावे : केसरकर

By admin | Updated: June 30, 2017 19:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण संदर्भात आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. ३० : जिल्ह्यातील नजिकच्या काळात होणारा गणेशोत्सव लक्षात घेता वीज वितरण मधील अडी-अडचणी तत्काळ सोडविण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण संबंधीत आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आवश्यक आहे. तेथे ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात यावा. यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. वाहनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. गणपतीपूर्वी वीज देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत. ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जादा प्रमाणात लोखंडी पोल देण्यात येऊन विद्युतीकरणाची कामे सुरु करावीत. सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता वीज वितरण अधिका-यांनी घ्यावी, अशा सुचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे केल्या.लोकांचा वावर ज्या- ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आपत्ती व्यवस्थापनातूनही खर्च देण्यात येईल. तसेच ज्या- ज्या शाळेच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत अशी ठिकाणे शोधून सदरचे ट्रान्सफॉर्मर शाळेकडून अन्य ठिकाणी हलवण्यात यावेत, शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात यावी. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, मालवण नगरपालिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, चंद्रशेखर पाटील व अन्य कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, वीज ग्राहक उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी वीज वितरणाबाबतच्या समस्या मांडल्या. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कंत्राटी कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना ओव्हर टाईम मिळावा. काम करण्यासाठी लागणारे सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावे, फळबागायतीचे वीज वितरणामुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी अशा अडचणी येथे मांडण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उपअभियंता यांनी काम करत असताना येणा-या अडचणी विषद केल्या.जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, गणपती मध्ये येथील लोकसंख्या दीडपटीने होत असल्याने सर्वांनीच गणपतीपूर्वी विज वितरण सुरळीत होण्यासाठी काम करायचे आहे. ज्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता आहे ती झाडे तोडण्याची कामे ताबडतोब पूर्ण करण्यात यावीत. प्रारंभी महावितरणचे आंबेकर यांनी उपस्थित स्वागत केले तसेच प्रास्ताविक चंद्रशेखर पाटील यांनी केले.