शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृगाची हुलकावणी; ‘आर्द्रा’ची आस

By admin | Updated: June 21, 2017 00:56 IST

बळिराजाची चिंता वाढली : गेल्या २0 दिवसांत जिल्ह्यात ८१४ मि.मी.पाऊस; उगवण झालेली पिके धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी / चिपळूण : बनावट अ‍ॅक्सेसरीज विक्री करणाऱ्या रत्नागिरीतील तीन आणि चिपळुणातील दोन मोबाईल दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला. या दोन्ही छाप्यात पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे बनावट अ‍ॅक्सेसरीज जप्त केले आहेत. याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांमधून बनावट वस्तू विक्री केल्या जात असल्याची बाब या धाडींमुळे उघड झाली आहे. रत्नागिरीतील खेतेश्वर, महालक्ष्मी व नागणेशी मोबाईल शॉपी या दुकानांवर पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. निखिल दिनकर पाटील (२६, रा. शाहू मिल कॉलनी, कोल्हापूर) हे इन्टेक्स कंपनीचे तपासणी अधिकारी आहेत. रत्नागिरी शहरात आठवडा बाजार परिसरात असलेल्या खेतेश्वर, नागणेशी व महालक्ष्मी या मोबाईल दुकानांमध्ये मोबाईलच्या बॅटऱ्या व इतर बनावट अ‍ॅक्सेसरीज विक्री होत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे निखिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेऊन माहिती दिली. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग पाटील यांच्या एका पथकाने आठवडा बाजार परिसरात जाऊन प्रथम खेतेश्वर दुकानावर छापा मारला. त्यानंतर बाजूला असलेल्या महालक्ष्मी व नागणेशी या मोबाईल दुकानांवर छापा मारला. याठिकाणी पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाखांचा बनावट ऐवज जप्त केला आहे. कॉपीराईटप्रकरणी पोलिसांनी बगताराम मल्लाजी पुरोहीत (रा. मुंबई), हरसनराम नाथुजी पुरोहीत (रा. तेली आळी) व महेंद्रसिंग पर्वतसिंग राठोड या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिपळूणमध्येही याच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. चिपळुणात दोन मोबाईल शॉपींच्या मालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून साडेतीन लाखांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनोजकुमार देवरामजी परमार व छगनराम मेघाजी चौधरी (दोघे रा. चिपळूण) अशी त्यांची नावे आहेत. निखिल पाटील यांनीच तेथेही गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी येथील पोलिसांच्या मदतीने शनिवारी सायंकाळी ४ वाजता या दोन्ही मोबाईल शॉपीवर छापा टाकला. यावेळी तेथे असलेल्या साहित्यावर इंटेक्स कंपनीचे ओरिजनल होलोग्राम व बारकोड दिसून आला नाही. त्यामुळे या दोन्ही दुकानांमधून ३ लाख ४४ हजार ५५० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २६९ बॅटऱ्या, २२९ क्लिप कव्हर, ८१ बॅक कव्हर जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव करीत आहेत. ग्राहकांच्या माथी बनावट मालच मोठमोठ्या मोबाईल शॉपीमध्ये मिळणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज या बनावट असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. ग्राहकांच्या माथी अशाच बनावट गोष्टी मारल्या जातात आणि त्यातून बराच पैसा काढला जातो, ही बाबही आता स्पष्टपणे उघड झाली आहे.