शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उष्णजल प्रक्रिया अहवाल पंधरा दिवसांत

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात.

रत्नागिरी : ज्या फळमाशीच्या कारणासाठी युरोपीय देशांनी हापूस नाकारला, ती फळमाशी नष्ट करण्यासाठी हापूसवर उष्णजल प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पातळ सालीच्या हापूसला ही प्रक्रिया सहन होईल का, याबाबतचे संशोधन आंबा-काजू मंडळातर्फे केले जात आहे. अर्थात त्यासाठी प्रथम फळमाशी तयार करण्यापासून संशोधनाला सुरुवात करावी लागल्याने ‘उष्णजल’च्या अहवालासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे तसेच अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जिल्ह्यातून आंबा विक्रीस पाठविण्यात येत आहे. आंब्याचे प्रमाण कमी असले तरी दरही समाधानकारक नाहीत. १५०० ते ४००० रुपये इतका पेटीला भाव मिळत आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे भाव असे व्यापारी सांगत असले तरी शेतकऱ्यांचे योग्य दराअभावी नुकसान होत आहेशेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी परदेशात आंबा पाठविला जातो. सध्या आखाती प्रदेश वगळला तर अन्य देशांनी घातलेल्या जाचक अटीमुळे सर्रास शेतकऱ्यांना आंबा विक्रीला पाठविणे शक्य होत नाही. बहुधा एप्रिल, मे मध्येच आंबा परदेशात पाठविण्यात येतो. आंबा काजू बोर्डातर्फे पणन विभागामध्ये याबाबतचे संशोधन केले जात आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)आधी फळमाशीची निर्मितीआंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो; परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पेरूतून फळमाशी निर्मिती, त्यानंतरच फळमाशीचा आंब्यावरील परिणाम व आंब्यावरील उष्णजल प्रक्रिया, त्याचा फळमाशीवर होणारा परिणाम अशा टप्प्याटप्प्याने संशोधन होत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे अपेक्षित आहे.