शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गुहागरमध्ये दुर्गादेवी मंदिर वर्धापनदिन कार्यक्रम

By admin | Updated: April 27, 2015 00:12 IST

जागृत देवस्थान : गिरीष बापट यांचीही उपस्थिती

गुहागर : कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या श्री दुर्गादेवीच्या मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा ३० एप्रिल ते १ मे या दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.गुहागर २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मंत्रपठण व महापूजा, असून यात औरंगाबाद, नाशिक, देवरूख, हेदवी या ठिकाणच्या वेदपाठशाळेतील सुमारे १५० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. यावेळी नाशिक येथील वथदक चुडामणी शांताराम भानुसे, औरंगाबाद येथील वेदमूर्ती दुर्गादरू मुळे, वेदमूर्ती योगेश सोहनी यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रम होणार आहे. डॉ. राजेंद्र फडके व तुषार पेठे यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. देवस्थानने गतवर्षी संकल्प सोडलेल्या श्रींचा चांदीचा देव्हारा हा पूर्णत्वास आला असून त्याचे अनावरण अन्न नागरी पुरवठा व संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते सकाळी १० वा. होणार आहे. यावेळी आ. भास्कर जाधव, बाळ माने, प्रशांत शिरगावकर, विनायक मुळ्ये उपस्थित राहणार आहेत. रा. १०.३० वाजता मान्यवरांच्याहस्ते दुर्गाश्रीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रशासन व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ११.३० वाजता वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत व परिचय करुन सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता दुर्गादेवीची सवाद्य मिरवणूक काढून येथील ग्रामदेवतेची भेट होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपूजा, पंचक्रोशीतून आलेल्या स्त्रियांकडून औक्षण व गोंधळ, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९.३० वाजता संगीत रजनी कार्यक्रमामध्ये प्रथमेश लघाटे, गझलकार कमोद सुभाष कला सादर करणार आहेत.कार्यक्रमाबाबत माहिती देताना अध्यक्ष किरण खरे यांनी सांगितले की, वयोवृद्ध ग्रामस्थांना सुसज्ज आजी आजोबा उद्यान, मंदिर परिसराचे बंदिस्तीकरण व भक्त प्रवेश द्वार मंदिराला सुवर्ण कळस चढवण्याचे देवस्थानचे आगामी संकल्प सर्व भक्तांच्या मदतीने लवकरच पूर्णत्त्वास जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहवे, असे आवाहनही देवस्थानच्यातीने करण्यात आले.यावेळी दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, सचिव संतोष मावळणकर, डॉ. आनंद खरे, अतुल फडके, गणेश भिडे, विक्रांत खरे, अद्वैत गोखले, अमोद गोळे, विक्रम खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)