शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

आचरा समुद्रात पात उलटली

By admin | Updated: November 9, 2016 00:43 IST

दोन मच्छिमार बचावले : स्थानिक मच्छिमारांनी केली मदत

आचरा : आचरा बंदरातून समुद्रात गेलेली पात (मच्छिमार नौका) सलग आलेल्या लाटांच्या माऱ्यामुळे केउंडला पॉर्इंटजवळ उलटली. यामुळे नौकेतील दोन मच्छिमार समुद्रात फेकले गेले. मात्र, आचऱ्यातील मच्छिमार बांधवांनी प्रसंगावधान राखून या दोन्ही मच्छिमारांना वाचविले आहे. ही घटना सोमवारी घडली.आचरा येथील समुद्रात मच्छिमार नौकेतील मुज्जफर बशीर मुजावर (वय २५) व हेमंत तळवडकर (४५) हे दोघे मच्छिमार सतत आलेल्या लाटांमुळे समुद्रात फेकले गेले. दोघेही उलटलेल्या नौकेचा आधार घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. यातील एकाने पोहत किनारा गाठला. किनाऱ्यावर आल्यानंतर त्याने पात बुडाल्याची माहिती आचरा बंदरातील मच्छिमारांना दिली. आचरा बंदरातील मच्छिमारांनी धाव घेत दुसऱ्याही मच्छिमाराचे प्राण वाचविले. या दुर्घटनेत नौकेचे तसेच इंजिन व जाळ्यांचे नुकसान झाले. मुज्जफर मुजावर व हेमंत तळवडकर हे आचरा बंदरातून महामुद मुजावर यांच्या मालकीची पात घेऊन मासेमारीसाठी निघाले होते. केउंडला पॉर्इंटदरम्यान पात आली असता अचानक लागोपाठ आलेल्या लाटांमुळे पात उलटली. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने घाबरून न जाता दोन्ही मच्छिमारांनी धीर सोडला नाही. उलट या दोघांनी पातीचा आधार घेत यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. शेवटी मुज्जफर मुजावर याने धाडस करत किनारा गाठला, तर हेमंत तळवडकर हे उलटलेल्या पातीचा आधार घेत समुद्रात होते. घटनेची माहिती आचरा मच्छिमार बांधवांना समजल्यानंतर हेमंत तळवडकर यांनाहीयातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)मच्छिमारांची धावाधावआचरा समुद्रात पात उलटल्याचे वृत्त कळताच मच्छिमार कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. आचरा बंदरातील मच्छिमार आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, भालचंद्र कुबल, रसिक जोशी, आबू मुजावर यांनी तत्काळ नौका काढत समुद्रात धाव घेतली. यावेळी समुद्रात पातीला धरून मदतीची वाट पाहणाऱ्या हेमंत तळवडकर यांचे प्राण वाचविले. उलटलेली पात दोरीच्या सहाय्याने बांधून अथक प्रयत्नांनंतर आचरा बंदरात आणली. यात पातीचे व इंजिनाचे नुकसान झाले. पातीतील जाळी मात्र समुद्रात वाहून गेली. समुद्रात एकामागोमाग सात लाटा येण्याचा प्रकार हा दुर्मीळ असतो. याचा फटका मात्र या मच्छिमारांना सहन करावा लागला.