शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उधाणामुळे पंधरामाड येथील वस्तीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:05 IST

सतर्कतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरानजीकच्या पंधरामाड-मिऱ्या भागात लाटांचा जोर वाढल्याने येथील वस्तीला धोका निर्माण झाला असून, घरासमोरील रस्ताही खचला आहे. मध्यरात्री तसेच आज, रविवारी पुन्हा मोठ्या लाटांचा मारा सोसावा लागणार असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील उधाणाच्या लाटांचा मारा येथील किनारपट्टीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून मिऱ्या भागातील नागरिक समुद्राच्या अतिक्रमणाच्या धोक्याला सामोरे जात आहेत.शनिवारी अमावस्येच्या भरतीमुळे समुद्राच्या पाण्याने पंधरामाड भागातील वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली. लाटांच्या माऱ्यामुळे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जगदीश पेजे आणि गोपीनाथ पोपडे यांच्या घरासमोरील रस्त्याला मोठे भगदाड पडून या भागातील माती ढासळली. दुपारी आलेल्या भरतीने या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले.१९८८ साली मिरकरवाडा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पुढेपर्यंत आणल्याने या भागाला समुद्राच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये येत असल्याने रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी या भागात तातडीने भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक राजेश नागवेकर, पल्लवी पाटील उपस्थित होते. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाचारण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या भागात जेसीबीच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात दगडांचा बंधारा टाकण्यात आला आहे. मात्र, शनिवारी दुपारपासून अमावस्येला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रात्रीपासून रविवारपर्यंत लाटांचा जोर कायम राहणार असल्याने या भागातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.मिऱ्यावासीयांची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी या भागाची पाहणी रत्नागिरीचे मंडल अधिकारी तसेच तलाठी यांनी केली. सतर्कतेच्या सूचनायेत्या आॅगस्ट महिन्यातील ९, १० २१, आणि २४ आॅगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यातील ८ आणि २० रोजी समुद्रात उधाणाच्या लाटा निर्माण होणार आहेत. त्यामुळे या भागातील ३४ घरांना सतर्कतेच्या सूचना तहसील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.