शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ

By admin | Updated: November 2, 2016 23:18 IST

सतीश सावंत यांची टीका : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सेना-भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक

सिंधुदुर्गनगरी : ‘अच्छे दिन’च्या मोहजालात अडकवून सेना व भाजप सरकारने गेल्या दोन वर्षात जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मागे नेण्याचे काम केले असून या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे निष्क्रीय व्यक्ती कशी असू शकते याचे जिवंत उदाहरण आहे. पालकमंत्र्यांची प्रशासनावरील ढिली पकड, विकासाबाबतची त्यांची उदासिनता यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. ही स्थिती पाहता सेनेचा ‘दीपक’ प्रकाशमानच झाला नाही. अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे सांगतानाच जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांचा पाढा वाचत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री तसेच सेना-भाजप सरकारवर घणाघाती प्रहार केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी युती सरकारच्या दोन वर्षे पूर्ततेचा पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, नव्याने होऊ घातलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ हा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे डागडुजीचे आश्वासन देऊन कोणतेही काम न करता फक्त मंजूर झालेल्या ४० लाखांची दिवाळी साजरी केली. त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. सरकार आणखी कितीजणांचे प्राण जायची वाट बघणार आहे? एपीएलचे धान्य आॅक्टोबर २०१४ पासून रेशन दुकानांवर मिळणे बंद झाले आहे. मुळातच जी कुटुंबे बीपीएलखाली येत होती ती शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एपीएलखाली गेली आहेत. जिल्ह्यातील १३ लघुसिंचन प्रकल्प व ३३ छोटी धरणे युती सरकारने रद्द केली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पाटबंधारे प्रकल्प निधीअभावी रखडून पडले आहेत. याशिवाय ठिबक सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध नाही. कणकवली तालुक्यातील हळवल व वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे रेल्वे ब्रीजसाठी नारायण राणे यांच्या कारकिर्दीत जिल्हा नियोजनने निधी उपलब्ध करून देऊनही पुढील कामे पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे जनतेचे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील कृषीपंपांची १३९३ कनेक्शने अद्यापही देणे बाकी असून नोव्हेंबर अखेरपर्यंत जेमतेम ३०० कनेक्शने दिली जातील. पण उर्वरित कनेक्शनबाबत काय? याबाबत सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीपासून वंचित रहावे लागत आहे. राज्यस्तरीय कृषी यांत्रिकीकरण विभागाच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यशासन राबवित असलेली रोजगार हमी योजना भाजप-सेना सरकारने बंद केली आहे. कुडाळ तालुक्यातील मुळदे हॉर्टीकल्चर कॉलेजला निधीअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर एमआयडीसी येथे भात गिरणीचे भूमिपूजन केले त्याचे पुढे काय झाले? दारिद्र्यरेषेखालील असलेल्या लाभार्थ्यांना घरगुती कनेक्शन देण्यात येणार होते. परंतु अद्यापही अनेक लाभार्थी भाजप-सेना सरकारने वंचित ठेवले आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यात भाजप-सेना सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सत्तेत येताना दिलेली आश्वासने या सरकारने पूर्णत्वास नेलेली नाहीत. या दोन वर्षात नवीन रोजगार निर्मिती करण्यात सरकारला अपयश आले असून डाळ, भाजीपाला, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू महाग झालेल्या आहेत. शेती, उद्योग क्षेत्रात निराशा पसरलेली आहे. नवीन प्रकल्पांची निर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. शिक्षणक्षेत्रातील गोंधळाच्या वातावरणामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ अंधकारमय करण्याचे काम भाजप-सेना सरकारने होऊ घातला आहे. नोकरशाहीवर सरकारचा अंकुश नाही. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकंदरीत सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम या सरकारने केले असून जातीयतेच्या राजकारणाला खतपाणी घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. मराठा समाजासारख्या मोठ्या समाजावर झालेल्या अन्यायाविरूद्ध कोट्यवधी जनता रस्त्यावर उतरुनही युती सरकारला जाग आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जात नाही. मुंबईत इंदू मिलच्या जागेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पुढे काय झाले? हे सरकारला माहित नाही, असेही सतीश सावंत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (प्रतिनिधी) प्रकल्प रखडले : जिल्ह्याला मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासातील ‘माईलस्टोन’ ठरु पाहणाऱ्या चिपी येथील नियोजित विमानतळाची क्षमता कमी करून एअर स्ट्रीप्स लहान करण्यात येणार आहे. चिपी विमानतळावरील एअर स्ट्रीप्स लहान केल्याने मोठी विमाने कशी उतरणार हा प्रश्न आहे. सध्या या प्रकल्पाचे व सी-वर्ल्ड प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. चिपी विमानतळाचा व सी-वर्ल्ड प्रकल्पाचा जिल्ह्याच्या पर्यटनावर पडणारा मोठा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठा फटका बसणार आहे. रेडी बंदरासारखा प्रकल्प रद्द केल्याने जिल्ह्यातील उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले असून या निर्णयाविरूद्ध भाजप-सेना सरकारचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.