शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांमुळे मुंबईतील आघाडी संपुष्टात

By admin | Updated: January 20, 2017 23:00 IST

सुनील तटकरे : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू

रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. मुंबईसाठीच्या आघाडीचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोकण शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविणारे पुरोगामी आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले होते.या पत्रकार परिषदेला शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे ती तुटली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शेकापची आघाडी होणार आहे. काही जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी कॉँग्रेसबरोबर एक बैठक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील संसदीय बोर्डाची बैठक येत्या २५ जानेवारीला होणार आहे. येत्या चार दिवसांत आघाडीबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे तटकरे म्हणाले. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षही सहभागी होत असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. टिष्ट्वटरवर केवळ टिव टिव...गेली दोन वर्ष ३ महिन्याच्या काळात केंद्रात व राज्यातही सत्ताधाऱ्यांनी टिष्ट्वटरवरून विकासकामांबाबत अनेकवेळा टिष्ट्वट केले. हे आश्वासनांचे बुडबुडे केव्हाच फुटले आहेत. सत्ताधाऱ्यांचे हे टिष्ट्वट म्हणजे केवळ टिव टिव ठरल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.नोटाबंदीने शेतकरी उद्ध्वस्त...नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने हा निर्णय फसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, विकासदर २ टक्क्यांनी घटला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कामगारांवर बेकारीचे संकट आले आहे. चुकीचे निर्णय हट्टाने राबविल्याचे हे फलित आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.