शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रेरणेने विकासाची समान संधी

By admin | Updated: April 15, 2017 13:06 IST

पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभावातून जे जे पाहिले, अनुभवले तसे कटू अनुभव येणा-या नवीन पिढ्यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता हा भारतीय राज्यघटनेचा पाया असावा असा डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा आग्रह होता. भावी पिढ्यांना सर्वांगीण विकासाची समान संधी मिळावी ही त्यांची प्रेरणा होती असे प्रतिपादन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक समता सप्ताहाचा सांगता कार्यक्रम कणकवली महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार वैभव नाईक,अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, कणकवलीचे तहसिलदार गणेश महाडिक, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता सोरटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक के.डी. जाधव, प्रमुख वक्ते नवनाथ जाधव, गृहपाल व्यंकटेश साळे आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. डॉ.आंबेडकर समाजव्यवस्थेची आपल्या बुध्दीमत्तेने घडी बसवली. त्यांचे जीवन संघर्षमय होते. त्यांनी पावलोपावली मानसन्मान न मानता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ज्ञानाचा ठसा उमटविला. समाजाचे व मानवजातीचे कल्याण होण्यासाठी ते झगडत राहिले.डॉ. आंबेडकर यांच्याविषयी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या सप्ताहानिमित्त कणकवली महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धेनिमित्त गुणवंत विद्याथ्यार्ना सत्कार करण्यात आला.डिजीधन मेळाव्यात भीम अ‍ॅपचे अनावरण

डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम आधार अ‍ॅपचे अनावरन केले. डीजीधन या योजनेव्दारे भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आहे. मोबाइलच प्रत्येकांची बँक बनावे आणि आपल्या हाताचा अंगठा हा त्या बँकेची चावी बनावी. असे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. या डिजीधन मेळाव्यात भीम अ‍ॅपचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच काही युवकांनी भिम अ‍ॅप अपलोड करून घेतले. याद्यारे त्यांनी कॅशलेस व्यवहाराचे प्रात्यक्षिकेही केले.