सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला बुधवारी पावसाने झोडपल्यानंतर काल, गुरुवारपासून थोडी उघडीप घेतली आहे. आज, शुक्रवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी चालूच होत्या. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पडझडीत सुमारे ६0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६.७५ मि.मी.च्या सरासरीने २१४ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७८८.0३ एवढ्या सरासरीने पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.बुधवारी जिल्ह्याला पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, काल गुरुवारी पावसाने थोडी उघडीप घेतल्यानंतर आज दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. पावसामुळे जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पडवे येथे जनार्दन कोयंडे यांच्या घराचे २४ हजार २८0 रुपयांचे, तर रानबांबुळी येथील यशवंत वामन वायंगणकर यांच्या घराची पडझड झाल्याने १७ हजार ९८0 रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये झाली आहे. देवगड आनंदवाडी येथील भिकाजी पांडुरंग मुणगेकर यांच्या घराचे छप्पर आज सकाळी कोसळून २0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तलाठी एस. जे. नाईक यांनी पंचयादी केली.
सिंधुदुर्गनगरीत पावसाने घरांची पडझड
By admin | Updated: August 1, 2014 23:25 IST