शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग पंचायत समिती सदस्याचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: June 14, 2017 22:52 IST

दोडामार्ग पंचायत समिती सदस्याचा अपघातात मृत्यू

xलोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्र्ग : वझरे तिठा येथे दुचाकी आणि भाजी वाहतूक करणारा मिनी टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत कृष्णा जाधव (वय ४०) यांचा मृत्यू झाला. जाधव मंगळवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.अपघात घडताच टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, जोपर्यंत टेम्पोचालकास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आयी ग्रामस्थांनी घेत दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. हे रास्ता रोको आंदोलन तीन तास चालले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालकास अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको तूर्तास थांबविण्यात आला.दोडामार्ग पंचायत समितीचे सदस्य भरत जाधव हे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन आयी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ८.३० वाजेपर्यंत ते दोडामार्ग येथील भाजपच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर रात्री १० वाजता धाटवाडी येथून टीव्हीवरील बातम्या बघून ते घरी जाण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान वझरे तिठा येथे ते पोहोचले असता बेळगावहून दोडामार्गच्या दिशेने भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला आपल्या विरुध्द बाजूला जात जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, दुचाकी मिनी टेम्पोला अडकून काही अंतरावर फरफटत गेली आणि त्यानंतर टेम्पो पलटी होऊन त्याखाली चिरडली. मात्र, अपघात घडताच जाधव दुचाकीवरून फे कले गेल्याने त्यांचे डोके जोरात आदळून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच त्यांचा पाय व हातही मोडला. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी म्हापसा-गोवा येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांचा तीन तास रास्ता रोकोदरम्यान, अपघात घडताच टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीसही उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे संतापलेल्या आयी ग्रामस्थांनी भरत जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास हा रास्ता रोको चालला.