शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित विकासकामे करु

By admin | Updated: October 27, 2015 23:58 IST

नीतेश राणे : विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा काँग्रेसला पठिंबा

वैभववाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास टाकून विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विकास आघाडीला अपेक्षित विकासकामे करुन आदर्श शहर बनविले जाईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. विकास आघाडीच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आलेले रवींद्र्र रावराणे व सुचित्रा कदम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर करीत आमदार राणे यांनी रावराणे व सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांचा कार्यालयात सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, वाभवेचे माजी उपसरपंच गंगाराम उर्फ दादा रावराणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, बाळा हरयाण, अंबाजी हुंबे, प्रफुल्ल रावराणे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीची निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यावर आम्ही लढवत आहोत. त्यामुळे विकास आघाडीने आमच्यावर विश्वास दाखवत दोन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा देत विकासासाठी पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला साजेसे काम करुन विकासाची घोडदौड आम्ही सुरु ठेवू. जे पक्ष सर्व प्रभागात स्वत:चे उमेदवार देवू शकले नाहीत. ते नगरपंचायतीत निवडून गेले तर शहराच्या विकासाची अवस्था काय असेल याची कल्पना आल्यामुळेच रावराणे व कदम यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्षाच्या पूर्ण बहुमताचा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)काँग्रेसचा झेंडा फडकवूया ! : गंगाराम रावराणेवाभवेचे माजी उपसरपंच गंगाराम रावराणे यांनी बिनविरोध नगरसेवकांच्या पाठिंब्याबाबत स्पष्ट केले की, गावातील निवडणूक बिनविरोध करून गावाची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवून नारायण राणे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांना एकसंघ राहण्याची गरज आहे.