शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

आराखडा कागदावर राहू नये

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

वैभव नाईक यांच्या सूचना : मालवण तालुका पाणीटंचाई आढावा बैठक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाची सरासरी ४० टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा पोहचण्यापूर्वी तयार केलेला पाणी टंचाईचा आराखडा कागदावर राहू नये. पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पक्षीय राजकारण करता आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. विंधन विहिरींच्या गाळ उपसासाठी असणारी अत्याधुनिक मशीन यंत्रणाही जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाबाबत गुरुवारी तालुका स्कूल येथे आढावा सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर, संजीवनी लुडबे, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, राजेंद्र्र प्रभुदेसाई, हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी पी. डी. जाधव, पाणीपुरवठा विभागाचे वैभव वाळके तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गरम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष उपस्थित होते. आजच्या सभेस यांत्रिकी विभागाचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गतवर्षी ७० विंधन विहिरी घेण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दोनच कामांना मंजुरी मिळत असेल तर कागदपत्रे गोळा करून उपयोगच काय? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. तालुक्यात पाणी टंचाईसाठी अत्यावश्यक ठिकाणी आमदार निधी उपलब्ध करून देवू असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आवश्यक असल्यास फौजदारी करा : पराडकरसभापती परुळेकर यांनी काही गावात विहिरींची कामे अपूर्ण राहिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी या कामांना मंजुरी, देखरेख, निधी हे सारे अधिकार ग्रामसभेला असतात. आवश्यकता असल्यास फौजदारी दाखल करावी असेही सुचित केले. काही ठिकाणी विंधन विहीर अथवा नळपाणी योजनेसाठी बसवण्यात येणाऱ्या पंपासाठी आवश्यक ती कागदपत्रे देऊन मीटर बसविण्याच्या सूचना पराडकर यांनी केल्या. वैभव नाईक : पाणी टंचाईवर मात करूयावैभव नाईक म्हणाले, शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांपासून सरपंचानी सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. जलयुक्त शिवार योजनेतून मालवण तालुक्याला साडे चार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. आगामी काळात योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी सहभागी होऊन पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन केले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेत आपले गाव कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीने बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना आजपासून जाहीर करण्यात आलेला बंधारा पंधरवडा या कार्यक्रमा अंतर्गत असलेले पाणी साचवून तालुक्याचे १६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पाणी टंचाईवर मात करूया, असे आवाहनही नाईक यांनी केले.