शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

आरक्षण धोरणाचा फेरविचार नाही!

By admin | Updated: September 22, 2015 22:44 IST

आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या सूचनेवर विरोधी पक्षांकडून प्रखर टीका करण्यात आल्यानंतर सध्याच्या आरक्षण

शोभना कांबळे -रत्नागिरी---भारतावर ज्या ज्यावेळी आक्रमणे झाली, त्या त्यावेळी भारतीय सैनिकांनी प्राण तळहातावर झेलत परकीय आक्रमणे परतवून लावली. या आक्रमणांपैकी एक म्हणजे १९६५ मध्ये पाकिस्ताने केलेले आक्रमण. पाच महिने सुरू असलेल्या या युद्धात भारतीय सैनिकांनी प्राणांची बाजी लावत पाकला परतवून भारताला विजय मिळवून दिला. या युद्धात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ सैनिकांना वीरमरण आले. या विजयाला २३ सप्टेंबरला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९४८ पासून अगदी १९९९च्या कारगील युद्धापर्यंत भारताने अनेक आक्रमणे झेलली. मात्र, भारतीय सैनिकांनी प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन ही आक्रमणे परतवून लावली. १९६५मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर कब्जा करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. सलग पाच महिने हे युद्ध सुरू होते. मात्र, अनेक भारतीय सैनिकांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाकिस्तानला पळवून लावून विजय मिळविला. मात्र, यात अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ सुपुत्रांचा समावेश होता. शिपाई अर्जुन चांडे (मुसाड, ता. खेड), सूर्याजी मोरे (कोरेगाव, ता. खेड), बाबुराव म्हाबदी (कवळे, ता. खेड), नायक अनाजी मोरे (दिवाणखवटी, ता. खेड), लान्स नायक पांडुरंंग कदम (वावे, ता. खेड), गनर बाळा यादव (शिवथर, ता. खेड), हवालदार तुकाराम महाडिक (भेलसई, ता. खेड), शिपाई बाळाराम चव्हाण (कर्टेल, ता. खेड), लान्स नायक भीमराव कासारे (लाटवण, ता. मंडणगड), शिपाई तुकाराम पवार (सडवली, ता. दापोली), सिग्नलमन रामचंद्र शेडगे (रेवळी, दापोली), शिपाई बाळाजी जाधव (वाकवली, ता. दापोली), तुकाराम चव्हाण (पेढांबे, ता. चिपळूण), काशिनाथ अहिरे (चिंचघरी, ता. चिपळूण), धोंडू जाधव (बोरसूत, ता. संगमेश्वर) यांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य खेड, दापोली तालुक्यातील आहेत. देशरक्षणासाठी गेलेल्या या सैनिकांपैकी काही सैनिकांचे तर नुकतेच लग्न झाले होते, तर काहीजण आपल्या सहा महिन्यांच्या, वर्षाच्या तान्हुल्याला अनाथ करून गेले. अशा अनेक वीर सैनिकांच्या वीरमाता, वीरपत्नी यांनी त्यांच्या पश्चात आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत वाढवले आहे. २३ सप्टेंबर रोजी विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमिताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या वीर विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्या अशा एकूण २५ जणांचा गौरव करून या सैनिकांच्या हौतात्म्याला मानवंदना देण्यात येणार आहे. युद्धात शहीद झालेल्या या वीरांच्या पत्नींचा आज होणार गौरवसूर्याजी मोरे (कोरेगाव, ता. खेड)खेड तालुक्याला सैनिकी परंपरा आहे. शिपाई सूर्याजी मोरे यांचे वडील शिवराम मोरे हेही सैन्यदलात होते. त्यामुळे सूर्याजी मोरे आणि त्यांचे बंधू आत्माराम मोरे हेही सैन्यदलात गेले. सूर्याजी मोरे यांना १९६५ च्या युद्धात वीरमरण आले. आत्माराम यांचे चिरंजीव चंद्रकांत आता सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. सूर्याजी मोरे यांच्या पत्नी सावित्री सध्या गावालाच असतात.पांडुरग कदम (वावे, ता. खेड)पांडुरंग कदम शिपाई म्हणून सैन्यदलात कार्यरत होते. या युद्धात त्यांना वीरमरण आले, त्यावेळी त्यांचा मुलगा भगवान हा केवळ तीन महिन्यांचा होता. वडिलांचा वारसा चालवण्यासाठी पुढे भगवान कदम हेही सैन्यदलात दाखल झाले. २० वर्षे देशाची सेवा करून नाईकपदावरून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते आता आपली आई वासंती हिची सेवा करीत आहेत.हवालदार तुकाराम महाडिक (भेलसई, ता. खेड) तुकाराम महाडिक भारत पाक युद्धात शहीद झाले. त्यावेळी त्यांचा एक मुलगा जनार्दन चार वर्षांचा होता. दुसरा मुलगा जनार्दन हा गर्भात होता. पतीच्या निधनाने तर त्यांच्यावर आभाळ कोसळले. पण आपले पती देशसेवा करताना गेले, याचा आनंद अधिक होता. दत्ताराम महाडिक हे आता नोकरी करून आपल्या आईची सेवा करीत आहेत.शिपाई तुकाराम पवार (सडवली, ता. दापोली)तुकाराम पवार यांना १९६५ च्या युद्धात वीरमरण आले. त्यावेळी त्यांची एक मुलगी दोन वर्षांची, तर दुसरी अवघी सहा महिन्यांची. पत्नी सुलोचना पवार यांना सरकारकडून अवघी ४१ रूपये एवढी पेन्शन सुरू झाली. तसेच दोन्ही मुलींना प्रत्येकी सात रूपये शिक्षणासाठी मिळत. अखेर सुलोचना पवार यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलींना कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण दिले आणि त्यांचे विवाह करून दिले. आता दोन्ही मुली आईला सांभाळत आहेत. शिपाई काशिनाथ अहिरे (चिंचघरी, ता. चिपळूण) काशिनाथ अहिरे यांचे वय अवघे १८, १९ वर्षांचे. नुकतचं लग्न झालेलं. तरीही देशसेवा करण्याची संधी मिळताच आनंदाने सैन्यात भरती झाले. शत्रुशी लढताना युद्धात आलेलं वीरमरण हसत हसत झेललं. त्यावेळी पत्नी शेवंती अवघी १५ वर्षांची होती. मात्र, सासरच्या माणसांनी या वीरपत्नीचेही सन्मानाने पालनपोषण केले. वडील शेतकरी होते. तरीही त्यांनीही त्यांची काळजी घेतली. आता शेवंती अहिरे ६७ वर्षांच्या आहेत. सरकारच्या पेन्शनवर त्यांची आता गुजराण होतेय.शिपाई बाबुराव महाब्दी (कवळे, ता. खेड)बाबुराव म्हाबदी यांचे लग्न होऊन जेमतेम वर्ष झाले असेल, तोच त्यांना युद्धासाठी जावे लागले. या युद्धात त्यांना वीरमरण आले. आपल्या पतीच्या स्मृती जतन करत त्यांची पत्नी सुनंदा म्हाबदी या आपल्या माहेरी (जावळगाव, ता. खेड) परतल्या. आता त्या सुमारे ७५ वर्षांच्या आहेत.सिग्नलमन रामचंद्र शेडगे -(दावळी, ता. दापोली)रामचंद्र शेडगे २२ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १६ वर्षीय रूक्मिणी यांच्यासोबत झाला. १९६५ च्या युद्धात सिग्नलमन म्हणुन कार्यरत असतानाच त्यांना वीरमरण आले. ऐन तारूण्यात वैधव्य आलेल्या रूक्मिणी शेडगे यांनी आपल्या पतीचे वीरमरण झेलून आत्तापर्यंत वीरपत्नी म्हणुन सन्मानाने जगत आहेत.