शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

अनुकरण नको नवनिर्मिती करा

By admin | Updated: December 13, 2015 01:13 IST

अनिल नाईक : युवा चित्र शिल्प अभियान

कणकवली : चित्रकार-शिल्पकाराने माध्यमांचा यथायोग्य अभ्यास करावा. त्याचा उपयोग आपल्या नवनिर्मितीसाठी करावा. माध्यमातील तज्ज्ञ होणे हे एका अर्थाने गुलाम होण्यासारखे आहे. त्यापेक्षा नवे प्रयोग करून नवनिर्मिती करा. त्यातच कलाकाराचे सार्थक आहे, असे प्रतिपादन जे. जे. स्कूल आॅफ आर्टस्चे प्रा. अनिल नाईक यांनी केले. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आयोजित अखिल भारतीय युवा चित्र शिल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व्ही. के. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी रहेजा कॉलेज आॅफ आर्टस्चे प्रा. सुरेंद्र जगताप, गोवा येथील चित्रकार राजेंद्र उसपकर, अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कुऱ्हाडे, बाळा कदम, सुजित काणेकर, फारूख शेख, विनायक सापळे, प्रदीप मांजरेकर, शैला कदम, विनायक हरकुळकर उपस्थित होते. अनिल नाईक पुढे म्हणाले की, युवा कलाकारांना योग्य दिशा मिळाली नाही तर ते भरकटतात. निर्मिती ऐवजी ते अनुकरण करत राहतात. माध्यमांचे मास्टर होतात. शास्त्र उच्च पातळीवर गेले की कलेची निर्मिती होते. कारागिरी उत्तुंग स्तरावर गेली की कला जन्म घेते. ही प्रक्रिया श्वासोच्छवासासारखी हवी. एक माध्यम सोडले की दुसरे शिकता येते. कोणत्याही शैलीचा अभ्यास करणे योग्य आहे. मात्र, त्या शैलीचे गुलाम होऊ नका. कलेच्या बाबतीत कोणत्याही प्रथांचे अनुकरण नको. चित्रकार म्हणून समज येणे आवश्यक आहे. जे काम कराल ते अर्थपूर्ण हवे. निसर्गही कधी पुनरावृत्ती करत नाही. त्यामुळे चित्रकाराने तसे करू नये. प्रत्येक बाबतीत नाविन्य शोधावे. कार्यशाळेतून वैचारिक आदानप्रदान व्हावे. यावेळी नामानंद मोडक यांनी अभियानाची प्रस्तावना केली. पहिल्या टप्प्यात ७ हजार विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. ही स्पर्धा नसून तो एक प्रोत्साहनाचा भाग होता. त्याचा पुढील टप्पा म्हणून ही युवा चित्र-शिल्प कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्यानंतर संमेलनाकडे वाटचाल केली जाणार आहे. (प्रतिनिधी)