शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विनाशकारी प्रकल्पांना थारा देऊ नये

By admin | Updated: February 19, 2015 23:50 IST

आंबोलीत जनसुनावणी : इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत एकमुखी ठराव

आंबोली : आंबोलीच्या निसर्र्गसौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना आंबोलीत थारा देऊ नये, असा एकमुखी ठराव आंबोली येथील ग्रामपंचायतीत झालेल्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीत घेण्यात आला. आंबोली गावात इको-सेन्सिटिव्ह झोन हवा का नको, याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी सरपंच गजानन पालेकर, शशिकांत गावडे, दिनकर भिसे, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, गौरव दळवी, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. अळवणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोलीला पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींमध्ये आंबोलीच्या इको-सेन्सिटिव्ह जनसुनावणीबाबतच्या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. परंतु, ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. केवळ आठ ते दहा ग्रामस्थ या सुनावणीला उपस्थित होते. सरपंच पालेकर यांनी इको-सेन्सिटिव्हबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या विभागाशी संबंधित कोणती माहिती देणार आहात का, असे विचारले असता, संबंधितांनी वन, कृषी, महाराष्ट्र शासन यांच्या नावे असलेल्या जमिनींचे हेक्टरी क्षेत्र सांगितले. यानंतर ग्रामस्थ रामचंद्र गावडे यांनी आंबोलीत कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असताना इको-सेन्सिटिव्ह कोणत्या जमिनीला लावणार? असा प्रश्न करून, गेली २० वर्षे आम्ही आमच्या जमिनी मिळविण्यासाठी लढा देत असताना आपल्याकडून अशा जनसुनावण्या घेणे योग्य आहे का, असा सवाल केला. (वार्ताहर)आंबोलीत १९६५ पूर्वीपासूनच्या घरांवर व जमिनींवर वन लागलेले आहे. त्यामुळे जरी राखीव वने इको-सेन्सिटिव्हमध्ये घ्यायची म्हटली, तरी ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होत नाहीत, तोपर्यंत इको-सेन्सिटिव्हला आमचा विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले.