शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST

नीतेश राणे : खारेपाटण, तळेरे, साळीस्ते येथे चौपदरीकरणाबाबत ग्रामस्थांशी संवाद

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे सर्वेक्षण कोणतीही ठोस माहिती न देता केले जात आहे. ही पद्धत थांबली पाहिजे. भूमिपुत्रांवर होणारा अन्याय थांबण्याबरोबरच त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. भूमिपुत्रांच्या या हक्कांसाठी पक्षभेद विसरून अन्यायाविरूद्ध सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.महामार्ग चौपदरी करणाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी तळेरे, साळीस्ते, वारगाव, नडगिवे, खारेपाटण येथील चौपदरीकरणात जमिनी जात असलेल्या ग्रामस्थांशी सोमवारी थेट संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, शरद कर्ले, बाळा जठार, शरद वायंगणकर, गोट्या कोळसुलकर, बापू डंबे, शशांक तळेकर, दर्शना बांदेकर, दीपक नांदोस्कर, दिलीप तळेकर, प्रवीण वरूणकर, आनंद शंकरदास, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, एकनाथ कोकाटे, गजानन सावंत, अरुण कर्ले, राजेश वारंग, आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गाच्या सर्वेक्षणात कशाप्रकारे अन्याय केला जात आहे, याचे सविस्तर वृत्त कथन केले. आमदार राणे म्हणाले, सरकार आणि जिल्ह्यातील प्रशासन चौपदरीकरणाची आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत. जमिनीला भाव काय देणार हे भूमिपुत्रांना सांगत नाहीत. अंधारात ठेवून सर्व्हेचे काम सुरू करणे आणि विचारल्यास वर धमकावणे हा प्रकार म्हणजे आमच्या घरात येऊन, फुटपट्टी लावून आम्हालाच दम देण्याचा प्रकार आहे. हे थांबवायचे असेल, तर प्रथम संघटित होणे गरजेचे आहे आणि हे संघटन फक्त अन्यायग्रस्तांपुरते मर्यादित न राहता ते गावातील सर्व जनतेचे संघटन झाले पाहिजे. विकासाला विरोध करण्यासाठी नाही, तर अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्यासाठी, अन्यायग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटित व्हा, त्यात पक्षभेद नको. सरकार आणि जिल्हा प्रशासन यांची भूमिका नेहमीच संभ्रमावस्थेची आहे. कणकवली प्रांताधिकाऱ्यांसारखी जबाबदार मंडळी जमिनीची रक्कम भरपूर देऊ, असे सांगतात. भरपूर म्हणजे किती? शहरात अडीचपट आणि ग्रामीण भागात पाचपट? ही पटवारी संख्या किती रकमेच्या वर आहे, हे पहिले सांगा. झाडे आहेत, घरे आहेत. त्यांचे मूल्यांकन काय? जमीन व घरांसह भूमिहीन होणाऱ्यांचे पुनर्वसन कोठे करणार? शहराला एक आणि ग्रामीणला एक असा दुजाभाव का करताय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत शासन देत नाही आणि प्रत्येक भूमिपुत्राचे शंकानिरसन होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या सर्र्वेक्षणाच्या कामास आमचा विरोध राहणार असल्याचेही आमदार राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)आमच्यावरील अन्याय दूर करामहामार्गासाठी भूसंपादन करताना आमच्यावर शासनाकडून अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर करून आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी अनेक भूमिधारकांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली.