शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये : जाधव

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत.

चिपळूण : गेली ३२ वर्षे मी राजकारणात टिकून आहे. प्रतिवाद कधी केला नाही. दोन दिवसांपूर्वी माझ्या तुरंबव गावात एका कार्यक्रमात माझे मुलगे, पुतण्या व भाऊ हे बेसावध असताना त्यांच्यावर बाळकृष्ण जाधव व समर्थकांकडून हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा आमच्या भावकीतील वाद असून, एकतर्फी बाजू जनतेसमोर येत आहे. या भांडणात बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांचे नाव न घेता आमदार भास्कर जाधव यांनी आज (रविवारी) येथे दिला. आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुरंबव - पालेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार कार्यक्रमात झालेल्या दोन गटातील मारहाणीबाबत ते बोलत होते. व्यासपीठावरील एकही व्यक्ती गंभीर जखमी झालेली नाही. भाऊ सुनील जाधव, मुलगा समीर, विक्रांत तसेच पुतण्या हे बेसावध असताना त्यांना मारहाण झाली. सोडवायला गेलेल्या लोकांनाच मारहाण झाली. त्यामुळे बाळकृष्ण जाधव यांच्याकडूनच नियोजित हा मारहाणीचा कट होता, असा आरोप जाधव यांनी केला. काळोखातून दगडफेक केली गेली. काहींची खोटी नावे टाकली गेली आहेत. या मारहाणीमागे अन्य कंगोरे आहेत, असे जाधव म्हणाले. सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत. यामागे खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. हा विषय घरचा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. जास्त मार हा आमच्या लोकांना लागला आहे. कारण ते बेसावध होते. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने संघटना व बाहेरच्या लोकांकडून दबाव आणला जातोय. त्यामुळे दबाव कसा असतो, ते मी पोलिसांना दाखवून देईन. घरचे भांडण बाहेर जाऊ नये, म्हणून गप्प बसलो होतो. बाळकृष्ण जाधव हे साळसुदपणाचा आव आणत आहेत. सत्याची कास कधी सोडली नाही. बौध्द समाजबांधवांसाठी १५ लाखांचे समाजमंदिर आपण उभे केले आहे. बाळकृष्ण जाधव यांनीच जातीवादाचा लढा उभा केला आहे. अजित पालशेतकर हा देवळात जातो म्हणून त्याचा राग आहे. पोलीसही या प्रकरणात पक्षपातीपणा करीत आहेत. पोलिसांनी निपक्षपातीपणा या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)