शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना एकलकोंडे होऊ देऊ नये

By admin | Updated: February 13, 2015 23:00 IST

वंदना करंबेळकर : पालकांसाठी आयोजित कार्यशाळा

वेंगुर्ले : पूर्वी मुले पालकांना घाबरायची. आता पालकच मुलांना घाबरत आहेत. मुले ही अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे आईबाबा नीट वागत असतील, तर मुलेही नेहमी नीटच वागतील. मुलांना सारख्या सूचना न करता नीट समजावून सांगणे गरजेचे असते. ती एकलकोंडी होणार नाहीत याचीही पालकांनी खबरदारी घ्यायला हवी, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील समुपदेशक वंदना करंबेळकर यांनी वेंगुर्ले येथे बुधवारी केले. येथील परुळेकर दत्त मंदिराच्या आवारातील मुक्तांगण बालविकास प्रकल्पात पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात आपली मोहोर उमटविणाऱ्या वेतोरे हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती प्रभूखानोलकर, अ‍ॅड. देवदत्त परुळेकर, यंदाच्या राज्य विज्ञान प्रदर्शनात अव्वल विद्यार्थिनीचा मान मिळविणारी मुक्तांगणची माजी विद्यार्थिनी मृण्मयी प्रभूवालावलकर, आदी उपस्थित होते. यावेळी मृण्मयी वालावलकरचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मंगल परुळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेच्या शेवटी पालकवर्गातून आलेल्या विविध प्रश्नांना करंबळेकर यांनी अनुकूल उपाय सुचविले. मंगल परुळेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)