शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

ज्ञानेश्वर लोकरे फरार घोषित

By admin | Updated: May 4, 2016 23:46 IST

आंबोली नांगरतास स्फोट प्रकरण : उर्वरित चार आरोपींची निर्दोष मुक्तता

सिंधुदुर्गनगरी : आंबोली नांगरतास चेकमेट स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर लोकरे याला बुधवारी येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी फरार घोषित केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी मृत झाला आहे, तर उर्वरित चार आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास येथे ११ सप्टेंबर २००७ रोजी बँकेची कॅश घेऊन गोव्याकडे जाणारी गाडी लुटण्यासाठी लावलेल्या बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. वरील तारखेला दुपारी १.३० च्या सुमारास कानूर खुर्द (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील रजनीकांत मनोहर पाटील व दत्तात्रय तुकाराम गावडे हे पल्सर मोटारसायकल घेऊन आणि अशोक महादेव गावडे व संजय जानबा गावडे हे दोघे यामाहा मोटारसायकल घेऊन गणपती सणासाठी लागणारे पारंपरिक सामान गोळा करण्यासाठी नांगरतास घाणीचा आंबा याठिकाणी गेले होते.हे सर्वजण साहित्य गोळा करत असतानाच त्यांना सावंतवाडी-बेळगाव या रस्त्यावरच नांगरतास येथे मोरीच्या बाजूला एक हिरो होंडा मोटारसायकल आढळली. त्याचबरोबर रस्त्यावर एम एच ०९-एच २७११ हा ट्रक उभा दिसला. हाच ट्रक कानूर बाजारपेठेत चार दिवस उभा होता. त्यामुळे या ट्रकबाबत संशय आल्याने ते चारहीजण त्या ट्रकच्या दिशेने गेले. याचवेळी मोठा स्फोट झाला आणि यात संजय गावडे आणि अशोक गावडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले तर दत्तात्रय गावडे हा मोरीच्या खाली पडला. हे तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच रस्त्याला मोठा खड्डाही पडला.या सर्व जखमींना बेळगाव येथे रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर दहा मिनिटांनी घटनास्थळी चेकमेटची गाडी दाखल झाली आणि हा कट उघड झाला. या स्फोटातील जखमी संजय गावडे आणि दत्तात्रय गावडे हे मृत झाले होते.या स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माउली जगन्नाथ लोकरे (वय २५) याच्यासह संतोष उर्फ सीताराम अरविंद हेगडे (वय २०, रा. पंढरपूर), हनुमंत निवृत्ती बोराटे (वय २२, रा. कुर्डुवाडी, सोलापूर), विजय सौदागर लोकरे (वय २५, रा. मोहोळ-सोलापूर), राजाराम आप्पा दाहिगुडे (वय ३५, रा. मोहोळ, सोलापूर) आणि सचिन उर्फ सतीश तुकाराम खरात (वय २०, रा. सोलंकीवाडी, सोलापूर) अशा एकूण सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)४0 साक्षीदार तपासलेया प्रकरणात एकूण ४० साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणातील पहिला साक्षीदार १३ आॅक्टोबर २०१० रोजी तपासण्यात आला. गेली सहा वर्षे या प्रकरणाची सुनावणी चालली आणि बुधवारी या प्रकरणाचा निकाल लागला. यात जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रमुख आरोपी ज्ञानेश्वर लोकरे हा पोलिसांना अद्याप सापडून न आल्याने त्याला फरार घोषित केले, तर दोन नंबर आरोपी संतोष हेगडे हा मृत झाल्याने त्याला या खटल्यातून वगळण्यात आले, तसेच उर्वरित हनुमंत बोराटे, विजय लोकरे, राजाराम दाहिगुडे आणि सचिन खरात या चारही जणांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. संशयित आरोपींच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र रावराणे व अ‍ॅड. बापू गवाणकर यांनी काम पाहिले.