शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’

By admin | Updated: November 11, 2015 23:39 IST

अवकाळीने हिसकावला तोंडचा घास : शेतकरी हवालदील, सरकारने तातडीने मदत करण्याची गरज--लोकमत विशेष

रजनीकांत कदम -- कुडाळ  जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने काढून घेतल्याने या शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीतच दिवाळे निघाले आहे. तरी महामागाईच्या भस्मासूरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले भात पाऊस पडल्याने रानातच आडवे झाले. तर काही ठिाकाणी कापलेले भातपिक भिजून खराब झाले आहे. सलग तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीमध्ये पाणी साचले. पिकलेले आणि कापायला आलेले भाताचे पीक अगोदरच लोंबकळत होते. पण या पावसामुळे व पावसासोबतच्या वाऱ्यामुळे शेतात पडून पावसाच्या पाण्यात डुंबले आहे. त्यामुळे ते भात सर्रास खराब झाले. काही ठिकाणी भिजलेले हे भात काळे पडले आहे तर काही ठिकाणी भातशेतीच कुजून गेले आहे. शेतीतून काहीच उत्पन्न आले नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. या परिस्थितीने येथील शेतकरी उदासिन झाला आहे.शेतकरी त्रस्त : विस्कळीत वातावरण, निसर्गचक्र बदलल्याचा फटकानिसर्गचक्र बदलल्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असून, देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार नेहमीच उदासिनता दाखवित आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे सांगून उपयोग काय? नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे किती नुकसान झाले हे सांगण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. तर ते असलेली थोडीफार शेती वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. जूननंतर जुलै महिन्यात गायब झालेला पाऊस व त्यामुळे लांबणीवर पडलेली भातशेतीची लागवड व नंतर पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात यावर्षी भातशेतीची लागवडही काही प्रमाणात घटली. पण ज्यांनी ही लागवड केली त्यांना हंगामाच्या सरतेशेवटी आलेल्या पिकाची आशा लागून होती. भातकापणी झोडणीचा हंगामही जोमात सुरू झाला होता. दरम्यानच परतीच्या अवकाळी पावसाने भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले. महागाईला तोंड देताना सामान्य लोक हैराण झाले असताना अशा काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, याचा विचार करून येथील भातशेती करणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंदणी करणे सर्र्वाच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे बनले आहे.