शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

By admin | Updated: December 26, 2016 22:00 IST

चौकुळ येथील जमीन प्रकरण : नऊजणांनी ग्रामस्थांविरोधात दाखल केले होते अपील

आंबोली : चौकुळ येथील १०५ एकर जमिनीसंदर्भात जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी चौकुळ ग्रामस्थांविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी अपिलावर दिलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी कायम केल्याने गाव नेनेच्या १०५ एकर जमिनीत जगजीवन राऊळ यांच्यासह नऊजणांचा कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचे अ‍ॅड. राजाराम गावडे यांनी स्पष्ट केले.अ‍ॅड. गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मूळ चौकुळ कबुलायतदार गावकर यांच्या मालकीची चौकु ळ स. नं. ३४१-१ (नेने स.नं. ७४-०) क्षेत्र सुमारे १०५ एकर जमिनीचे आपण बक्षीसपत्राने मालक आहोत, अशी चुकीची वर्दी सन १९३१ मध्ये आत्माराम बाबूराव राऊळ यांनी चौकुळ तलाठ्यांना दिली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून ही १०५ एकर जमीनच आपल्या नावे करून घेतली. त्यानंतर सोमा धोंडू गावडे यांच्यासह चौकुळच्या ८८ ग्रामस्थांनी या काल्पनिक बक्षीसपत्राविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे १९९९ मध्ये केलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदारांनी पुनर्विलोकन अर्ज क्र. ८४-९८ ही केस चालविली. या केसचा २२ जानेवारी २००० रोजी निर्णय देताना या मिळकतीत आत्माराम बाबूराव राऊळ यांचा अगर त्यांच्या वारसाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्कसंबंध नसल्याने कागदोपत्री असलेली त्यांची नावे कमी करून ही जमीन पुन्हा कबुलायतदार गावकर चौकुळ यांच्या नावे झाली. त्यातच रमाकांत राऊळ यांच्यासह नऊजणांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे दाखल केलेले आर. टी. एस. अपील २००० सन २००४ मध्ये नामंजूर करून चौकुळ कबुलायतदार गावकरांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. त्यानंतर या आदेशाविरुद्ध जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुसरे आर. टी. एस. अपील २०१४ मध्ये केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडील अपिलात कबुलायतदार गावकर कृती समिती पदाधिकारी अ‍ॅड. राजाराम गावडे व इतर, तसेच प्रदीप भिकाजी गावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला, असेही पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)यापूर्वीचा निर्णय कायमजिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडी यांचा यापूर्वीचा निर्णय कायम केला. त्यामुळे जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी ही १०५ एकर जमीन काल्पनिक बक्षीसपत्राआधारे बळकावल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. यापूर्वीही रमाकांत आत्माराम राऊळ व इतरांनी या मिळकतीला आपली नावे असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत लाखो रुपयांना विक्रीस काढली होती.