शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: August 15, 2016 00:18 IST

मधु मंगेश कर्णिक यांना जीवनगौरव : ३१ आॅगस्ट रोजी पुरस्कारांचे वितरण

कणकवली : सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विविध पाच पुरस्कार देण्यात येणार आहेत. यापैकी स्व.बाळासाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. यासह इतर पुरस्कारांची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँकेच्या कणकवली शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी बँकेचे संचालक आर. टी. मर्गज, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आनंद सावंत तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत यांनी पुरस्कार देण्यामागची बँकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात यावेत. अशी संचालकांची मागणी होती. त्यानुसार पुरस्कार निवड समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, प्रा. अरुण पणदूरकर, जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक एस. ए. मणेरीकर, सेवानिवृत्त सहकार अधिकारी महेश्वर रायकर, रविंद्र आठलेकर यांचा समावेश होता. या समितीने चार पुरस्कारांसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी केली. तसेच प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले. त्यानंतर पुरस्कारासाठी संस्था तसेच व्यक्तींची निवड केली आहे. सहकार क्षेत्रात चांगले काम केलेल्या व्यक्तींच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या कामाची आठवण म्हणून हे पुरस्कार देण्याचे बँकेने निश्चित केले आहे. या पुरस्कारामुळे सहकारक्षेत्रात चांगले काम करण्याची चढाओढ लागेल आणि पर्यायाने सिंधुदुर्गचा विकास अधिक जोमाने होईल. हा उद्देशही पुरस्कार देण्यामागे आहे. जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले नव्हते. तर सर्वानुमते तो पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सावंत यांनी सांगितले.(वार्ताहर) पुरस्कारप्राप्त मानकरी जिल्हा बँकेच्यावतीने दिला जाणारा ‘शिवरामभाऊ जाधव स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला, शिक्षणमहर्षी केशवराव राणे स्मृतीप्रित्यर्थ ‘उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार’ मारुती पांडुरंग पाटील (मेढा,मालवण) यांना, डी.बी. ढोलम स्मृतीप्रित्यर्थ ‘उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार’ पांडुरंग विष्णू दळवी, खासगी सचिव श्री गिरेश्वर प्रासादिक विकास सेवा सोसायटी (वजराठ,वेंगुले) यांना तर भाईसाहेब सावंत स्मृतीप्रित्यर्थ ‘कृषिमित्र पुरस्कार’ बाळकृष्ण गणेश गाडगीळ (वेतोरे, वेंगुर्ले) यांना जाहीर झाला असल्याचे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.