शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

मदतीचा हात : गंगापूर सोहळ्यात ५२ शेतकऱ्यांना सहाय्य; मराठवाड्यात दुष्काळाची छाया

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे पाऊस झालेल्या भागातील ५२ शेतकऱ्यांना रब्बीसाठी गहू, ज्वारी, हरभऱ्याच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाटप करण्यात आले. स्वामीजींच्या उपस्थितीत विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे आदींच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.गंगापूर येथील लासूर - गंगापूर महामार्गावरील प्रांगणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा झाला. त्यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रभारी नगराध्यक्ष फैसल चाऊस, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, राजेश्वर मुंदडा, नगरसेवक संदेश गंगवाल, किशोर धनायत, बाजार समिती सभापती नंदकुमार गांधीले आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले, समाजाला उपदेश करुन बिघडलेल्या माणसांना घडवण्याचे काम स्वामीजी करत आहेत. पावसाचे पाणी वाचले तरच भविष्यात शेतकरी जगू शकतो. शिवसेना उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. येथील जनतेला दिलासा व आपल्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामीजींनी १ लाख ४४ हजार जणांना विधीवत पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे. त्यांचे हे कार्य मोठे आहे.या सोहळ्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. हिंदू समाज जाती, पंथ व राजकीय गटागटांत विखुरल्याने त्याची वाताहत झाली आहे. हिंंदू धर्म वाचवण्यासाठी राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लालसेपोटी भरकटलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम गुरूचे ऐकले पाहिजे. हिंदू धर्मप्रचार, प्रसार व संस्कृती टिकवण्यासाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत.सामाजिक उपक्रमांतर्गत संस्थानतर्फे वाटप.विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती.हिंदू धर्म वाचविण्यासाठी राजाश्रयाची गरज.