शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेर्गंत ४१ अपघातग्रस्तांच्या वारसांना ८० लाख विमा रक्कमेचे वाटप 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 5, 2023 20:09 IST

महेश सरनाईक  सिंधुदुर्ग  : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात ...

महेश सरनाईक सिंधुदुर्ग  : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये खंडित कालावधीतील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना  ८० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये  खंडित कालावधीतील एकूण ७८अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी  तालुकानिहाय कणकवली -१०, वेंगुर्ला-५, देवगड-४, मालवण-८, वैभववाडी-२, सावंतवाडी -६, दोडामार्ग-२ व कुडाळ-४ अशी एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच यामध्ये अपघातामुळे अपंगत्व आलेल्या २ व्यक्तींचा समावेश आहे. तर ३९ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झालेला आहे.  संबंधित शेतकऱ्यांच्या वारस लाभार्थींना ८० लाख रुपये विमा रक्कमेचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरीत ३७ प्रकरणे  छाननी प्रक्रियेमध्ये आहेत.

शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लक्ष रुपये तर एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते.अपघाती मृत्यू प्रकरणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय अनुदान देण्याकरीता शासनाकडून एका वर्षाच्या कालावधीकरीता विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. सदर विमा कालावधी संपुष्ठात आल्यावर दुसऱ्या कंपनीची नियुक्ती होईपर्यंतचा कालावधी हा खंडीत कालावधी म्हणून गणला जातो. अशा खंडित कालावधीतील विमा दावे आयुक्तालय स्तरावर सादर करण्यात येतात. रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यु, पाण्यात बुडून मृत्यु, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, सर्पदंश, विंचूदंश, वीज पडून मृत्यु, इलेक्ट्रिक शॉक, अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु इत्यादी. अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास वारसदारांना लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये क्लेम फॉर्म भाग -१ व सहपत्र, क्लेम फॉर्म भाग २ (अ) व (ब),क्लेम फॉर्म भाग -३,सातबारा उतारा,६ क (वारस नोंद उतारा),६-ड (फेरफार उतारा),वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत), शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत), मृत्यु दाखला, अपंगत्वाचा दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत), प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयं साक्षांकित प्रत), घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत), पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास), इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास), वाहन परवाना (आवश्यक असल्यास),बँक पासबुक (झेरॉक्स प्रत), अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो, नावात/आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र या योजनेंतर्गत केवळ सातबारावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तिलाच नव्हे सातबारावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघात किंवा अपंगत्व आल्यास वरीलप्रमाणे लाभ देण्यात येतो.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग