शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीवरूनच तंटे

By admin | Updated: August 5, 2016 01:58 IST

तंटामुक्ती योजना : पुरस्काराच्या रकमेवरून गावागावात वाद

ओरोस : महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत अनेक गावांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत गाव तंटामुक्त करून लाखो रूपयांची पारितोषिके पटकावली. आता हीच पारितोषिकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या मनमानी कारभारामुळे तंट्याचे कारण ठरली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ही स्थिती आहे. शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे जिल्ह्यात स्वागत करून जिल्ह्यातील सर्वच गावांनी या योजनेत सहभाग नोंदवला. गाव तंटामुक्त समित्या स्थापन होऊन गावातील तंटे गावातच तडजोडीने मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. अनेकवेळा पोलिस स्टेशनला तक्रारी घेऊन जाणारे तंटामुक्त बैठकीतच त्यावर तोडगा काढू लागले. अशा तंट्यांचे निराकरण गावातील बैठकीतच होऊ लागले. गाव समित्यांमार्फत तडजोड करून आपापसात हे तंटे मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे पोलिस ठाण्यातही त्यांचा ताण कमी होऊ लागला. गावे आनंदाने नांदू लागली. वातावरण शांत झाले. याकरीता गावागावात नियुक्त झालेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपले गाव तंटामुक्त केले. यासाठी कोणतेही मानधन किंवा फायदा घेतला नाही. आपल्या गावाच्या विकासासाठी हे सर्व सदस्य एकत्र आले. यात सामान्य शेतकरी, शिक्षकवर्ग, नोकरदार, दुकानदार, पोलिस पाटील व ग्रामस्थ या सर्वांची मदत मिळत गेली. याच मदतीच्या जोरावर संबंधितांनी केलेल्या कामाची शासनाने दखल घेत गावांना पुरस्कार व पुरस्काराची रक्कम बहाल केली. गावे तंटामुक्त झाली. आता पुरस्कारापोटी मिळालेली रक्कमच तंटानिर्मितीचे आणि गावात अशांतता निर्माण होण्याचे कारण ठरत आहे. या रकमेचा विनियोग करताना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तत्कालीन तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामत: नागरिक पुरस्काराच्या विरूद्ध बोलत आहे. (वार्ताहर)जनतेची मागणी : रकमेचे आॅडीट करणार का?गाव तंटामुक्तीच्या माध्यमातून मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचा शासनाच्या निकषानुसार विनियोग होत आहे का? जातीय सलोखा, जनजागृती, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात का? गावातील तंटामुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम आणि त्यावर झालेला खर्च, गाव सुरक्षा रक्षक व सुरक्षेच्या अनुषंगाने कोणते उपक्रम सुरू ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक स्तरावर मूल्यांकन करण्याची गरज आहे. याचवेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने आॅडिट करून नियमबाह्य खर्चावर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थ व जनतेतून होत आहे.खर्चाचे निकष कोणते ?महात्मा गांधी तंटामुक्त समित्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली येत नाहीत. यातील पदाधिकारी व सदस्य हे ग्रामसभेने निवड केलेले असतात. शिवाय या समित्यांवर शासकीय कर्मचारी व प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असतो. मात्र त्यांना डावलून अधिकार असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हा निधी मनमानी पद्धतीने खर्च करताना दिसत आहे. त्यातून गावातील शांतता बिघडत आहे.