शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा फक्त मोर्चा अन् मोर्चाचीच !

By admin | Updated: October 24, 2016 00:06 IST

वैभववाडीत शुकशुकाट : अन्य समाज घटकांनी व्यवसाय ठेवले बंद

वैभववाडी : सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केलेल्या सकला मराठा क्रांती (मूक) मोर्चात वैभववाडीतून रणरागिणी, आबालवृद्धांसह हजारो मराठा बांधव सहभागी होण्यास गेले. त्यामुळे बाजारपेठत पूर्णत: शुकशुकाट होता. त्यामुळे दिवसभर शहरात मोर्चाची चर्चा आणि उपस्थितीच्या आकड्याचे कुतूहल होते. सकल मराठ्यांसह पाठिंबा दिलेल्यांपैकी अन्य काही समाज घटकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे जवळपास निम्मी बाजारपेठ बंद होती. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी जवळपास महिनाभर विविध स्तरावर नियोजन सुरू होते. विभागवार बैठका, गाववार दौरे, मेळावे, जनजागृती रॅली, आदींच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा भारदस्त करण्यासाठी अनेकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळे भात कापणीचा हंगाम जोरात सुरू असतानाही जातीचा अभिमान आणि सामाजिक अस्मिता जपण्यासाठी रणरागिणी, वृद्ध, युवकांसह हजारो मराठा बांधव क्रांती मोचार्साठी दिवस उजाडताच घराबाहेर पडले. ४सकाळी सात वाजल्यापासूनच मोर्चेकऱ्यांनी सिंधुदुर्गनगरीची दिशा धरली होती. त्यामुळे एरव्ही बाजारपेठ उघडण्याच्यावेळी असणारा शुकशुकाट मोर्चामुळे रविवारी सकाळीच कलकलाटात परावर्तित झालेला पाहायला मिळाला. ४सकाळीच सुरू झालेली वाहनांची रेलचेल दहानंतर मंदावली. अकरानंतर वैभववाडी, उंबर्डे, भुईबावडा बाजारपेठांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर शुकशुकाटच होता. दररोज गजबजणारे वाहनतळ आणि चौक काहिसे निर्जन झाले होते. ४मोजकीच दुकाने उघडी होती. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांसह मोक्याच्या ठिकाणी लावलेले भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे फारशी वर्दळ नसतानाही नाक्यानाक्यांवर मोर्चाची चर्चा ऐकायला मिळत होती. \मोर्चा यशस्वी झाल्याचे तेज मोर्चा सुरू झाला का?, मोर्चात कोण कोण सहभागी झालेत? भाषणे कोणी केली, मोर्चेकऱ्यांचा आकडा कितीवर गेला? मोर्चा संपला का? या आणि अशा अनेक बाबींचे कुतूहल मोर्चाला न गेलेल्यांमध्ये होते. त्यामुळे दर अर्धा-पाऊण तासाने प्रत्येकजण मोर्चाला गेलेल्या आपल्या जवळच्याकडून मोर्चाचे अपडेट्स घेत होते. इतकेच नव्हे तर मोर्चातील 'ड्रोन'बाबतही संवाद रंगले होते. दुपारी साडेतीननंतर मोर्चेकरी हळूहळू परतू लागल्याने संध्याकाळी बाजारपेठा पूर्वपदावर आल्या. मोर्चाहून परतलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोर्चा यशस्वी झाल्याचे तेज दिसत होते.