शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आचऱ्याचा दसरोत्सव अपूर्व उत्साहात

By admin | Updated: October 24, 2015 00:43 IST

शाही थाट : भाविकांची सोने लुटण्यासाठी गर्दी

आचरा : संस्थानी थाटाकरिता प्रसिद्ध असलेल्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा दसरोत्सव शाही थाटात पार पडला. सायंकाळच्या सुमारास इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरानजीकच्या रवळनाथ मंदिरातून तोफांच्या आतषबाजीनंतर श्रींची स्वारी आचरा बाजारपेठ येथील श्री देवी फुरसाई मंदिर येथे महालदार, चोपदार, अबदागीर, निशाण, मानकरी, देवसेवक, आदींच्या समवेत शाही लवाजम्यांसह प्रस्थान झाली. श्री देवी फुरसाई मंदिराच्या प्रांगणात ‘श्रीं’च्या स्वारीचे शिवलग्न लावण्यात आले. यानंतर येथे उपस्थित असलेल्या भाविकांनी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली.रामेश्वराच्या या प्रसिद्ध दसरोत्सवाकरिता बेळगाव, गोकर्ण, गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, आदी भागांमधून आचरा गावचे मूळ रहिवासी आचरेकर उपस्थित होते. श्री देव रामेश्वराला दसऱ्यानिमित्त पंचमुखी महादेवाच्या रुपात अलंकृत करण्यात आले होते. श्री रामेश्वराचे हे पंचमुखी महादेवाचे रूप भाविकांना वर्षभरामधून कार्तिक पौर्णिमा, दसरा व गुढीपाडवा या तीनच दिवशी पाहावयास मिळत असल्याने दुपारपासून श्री देव रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. श्री देवी फुरसाई मंदिरातही माहेरवाशिणींनी श्री देवीची ओटी भरण्याकरिता गर्दी केली होती. रात्री श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रींच्या स्वारीसमोर श्रींच्या दरबारात अनेक भाविकांनी आपली हजेरी लावून आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी श्री रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, वहिवाटदार प्रदीप मिराशी, राजू मिराशी, ऋषिकेश मिराशी व इतर बारापाच मानकरी व देवसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)