शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

सुमारे एक कोटीचे नुकसान : पंधरा दिवसांत दुसरी घटना

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर सोमवारी दुपारी पेटलेल्या वणव्यात तब्बल सोळाशे एकरमधील काजू बाग जळून खाक झाली. हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांत आगीची या परिसरातील ही दुसरी घटना असून, ऐन काजू हंगामात बाग जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवरील टाकवाडी, भोमवाडी व इसवाचे भरड हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हजारो काजू कलमांबरोबरच माळरानावरील लाखो रुपये किमतीचे गवतही जळून खाक झाले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकवाडीलगतच्या डोंगरात आग लागली. दुपारी वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत तब्बल दोन डोंगर जळून खाक झाले. दुपारच्या दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये टाकवाडी, भोमवाडी परिसरातील सोमा सावंत, सखाराम वासुदेव देसाई, एकनाथ अनंत सावंत, रामा शंभा सावंत, बापू अर्जुन सावंत, गणपत शंकर देसाई, भगवान शंकर देसाई, लवू नवसो देसाई, तुकाराम पांडुरंग देसाई, नाना सावंत, चंद्रकांत राजाराम देसाई, सूर्यकांत राजाराम देसाई, चंद्रकांत कुसो देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकरमधील हजारो काजू कलमे व कित्येक गवताची उडवी जळून खाक झाली. डेगवे व डिंगणेवासीय सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर बेचिराख झाला. काजू बागायतीमध्ये गवत असल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने आग भडकली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी उशिरा डेगवे तलाठी किरण गझीनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळाशे एकर परिसरात सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्नडिंगणे व डेगवे गावातील शेतकऱ्यांनी या परिसरात मोठ्या मेहनतीने काजू बागा उभ्या केल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांची काजू बागाजळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी जिवावर बेतून ही आग आटोक्यात आणली. मात्र, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी वाचविलेली काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यात नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.