शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

हक्काबरोबर कर्तव्य पार पाडा : राधाकृष्णन

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांची जपणूक केली आहे. एक नागरिक म्हणून मानवी हक्काचा विचार करताना त्याअनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचादेखील सर्वांनी विचार करायला हवा. हक्क मिळवतानाच त्याबरोबर येणारी कर्तव्ये योग्य रितीने पार पाडून इतरांचे हक्कही सुरक्षित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले. जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिनी रजपूत, विधी अधिकारी पी. एन. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या प्रगतशील समाजात मानवी हक्कांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मानव म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. या हक्काच्या बरोबरीने जबाबदाऱ्यादेखील वाढल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर हक्काचा वापर करताना इतरांचे हक्क जपणूकीसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. या प्रक्रियेतूनच संपूर्ण समाजाच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भावी पिढीला दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य आणि जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)