शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

६३० प्राथमिक शाळा गिरवणार ‘डिजिटल’ धडे

By admin | Updated: March 15, 2016 00:49 IST

पुढचे पाऊल : शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर विशेष भरे

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून अध्यापनाचे धडे देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ६३० प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठा आधार लाभणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या सुमारे १२०० आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थीसंख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.संगणक युग असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा वापर शालेय जीवनापासून व्हावा, त्यादृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दूरदृष्टी समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनाही डिजिटल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने केलेल्या सुरु केले होते. त्याला यशही आले असल्याचे समोर येत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये डिजिटल शाळा ही संकल्पना उत्तमरित्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रशाळांमध्ये डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविण्यात येण्याचा निर्णय घेतला होता. त्याची सुरुवात चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तळवडे क्रमांक १मधून करण्यात आली होती. तेथील सर्व स्थानिक ग्रामस्थांनी मिळून लोकवर्गणीतून २ लाख रुपये गोळा करुन ही शाळा डिजिटल स्कूल केली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा डिजिटल होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले. त्यानुसार आज मागील ८ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३० प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. या डिजिटल शाळांमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे घेत आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या टिकून राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. (शहर वार्ताहर)