शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुत्रोलीतील जमीन परस्पर विकली...

By admin | Updated: April 22, 2015 00:25 IST

देव्हारेत खळबळ : कोटींची फसवणूक

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील एकच जागा दोन मालकांनी दोघांना विकल्याने खळबळ माजली आहे. या फसवणुकीच्या प्रकारामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. जमिनीच्या भरमसाठ वाढत जाणाऱ्या किंमतींच्या हव्यासापोटी हा प्रकार घडत असल्याचे पुढे येत आहे.नायणे येथील रोहित दळवी या व्यक्तीने २०११ मधे येथे चार जागा नऊ लाख रूपयांना खरेदी करण्यासाठी नऊ लाख रूपये दिले होते. यापैकी एजंट व जागा मालक यांना नऊ लाख रूपये चेकने व रोखीने दिले आहेत़ मात्र, रक्कम घेऊनही जागा मालक व दलाल सदरच्या जागा खरेदीखत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यापैकी दलाल असलेली व्यक्ती ही राजकीय क्षेत्रात काम करत असल्याचे एैकावयास मिळत आहे. आपली राजकीय ताकद वापरून, सदरच्या जागा घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यास टाळाटाळ करीत आहे. ही जागा मालक व दलालांनी नायणे येथील व्यक्तीच्या नावे जागा न करता, त्या जागा दुसऱ्याच व्यक्तीला विकून मोकळे झाले आहेत. ही बाब नायणे येथील खरेदीदाराच्या लक्षात येताच, त्यांनी सदर व्यक्तींकडे व दलालाकडे संपर्क साधून आपण दिलेली रक्कम परत मागितली आहे. मात्र, धुत्रोली येथील या कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला असल्याचे समजते.आपले झालेले नऊ लाखाचे नुकसान पाहता, नायणे येथील जागा खरेदी करणारी व्यक्ती हा विषय आता तंटामुक्त कमिटीकडे मांडून, न्याय मागितला आहे. जर तंटामुक्त समितीकडे योग्य न्याय मिळाला नाही, तर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती रोहित दळवी यानी दिली. यापूर्वीही असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. काही दिवसापूर्वी कुंबळे येथील जागेमधे डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकारामुळे जागा खरेदी करताना मोठी खबरदारी घेण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसत आहे. ़ (वार्ताहर)सत्य समोर येण्याची गरज...दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण या भागात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून याबाबत काही दलालांना हाताशी धरून मालक व काही राजकीय नेते आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. केळशी, उटूंबर, बाणकोट, वेसवी, मुरूड, धुत्रोली या भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या विषयात सत्य पुढे येईल, असे स्पष्ट होत आहे.