शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धनगर कुटुंंबीयांना मिळाली वीजजोडणी

By admin | Updated: October 6, 2015 00:36 IST

सावंतवाडी तालुका : तीस वर्षानंतर घरात पडला प्रकाश

कसई दोडामार्ग : गेली तीस वर्षे उजेडाच्या शोधात असलेल्या वझरे कोळगीरवाडीतील धनगर कुटुंंबियांच्या घरात सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई - शाखा दोडामार्गचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वीजजोडणी देण्यात आली. त्यामुळे या कुटुंबियांच्या घरात प्रकाश पडला.धनगर वस्ती म्हटली की, बहुतांशी ठिकाणी या समाजाला ना जमीन, ना पाणी, ना वाट, ना रस्ता. या सर्व प्राथमिक गरजांपासून वंचित राहणारा घटक अशीच या समाजाची ओळख. मग ती तालुक्यातील कळणेची धनगर वस्ती असो वा आडाळीची धनगर वस्ती. अशाचप्रकारे गेली तीस वर्षे वीज जोडणीपासून वंचित राहिलेले वझरे कोळगीरवाडीतील आशा गवळी कुटुंब. या कुटुंंबाला आॅक्टोबर २०१४ मध्ये घरगुती वीज प्रकरण मंजूर झाले. परंतु, आॅक्टोबर २०१५ आले तरी त्यांच्या घरात वीजजोडणी देण्यात आली नव्हती.सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई शाखा - दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाशी त्यांनी त्वरित संपर्क साधला असता आज करतो, उद्या करतो अशी उत्तरे संंबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून मिळू लागली. शेवटी मंडळाचा हिसका संबंधित कंपनीला मिळताच गेली तीस वर्षे उजेडाच्या प्रतीक्षेत असलेल्या आशा गवळी कुटुंबियांच्या घरी वीजजोडणी देण्यात आली. याप्रश्नी वर्षभर सतत पाठपुरावा करणारे मंडळाचे तालुकाध्यक्ष सखाराम झोरे, उपाध्यक्ष भैरू वरक, सचिव चिन्मय पटकारे, खजिनदार महेश काळे, संतोष पटकारे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, गंगाराम काळे, विठू बोडेकर, सिध्देश पटकारे, रमेश बुटे, रमेश शेळके, संदेश वरक, अनंत ताटे, लक्ष्मण वरक, ज्ञानेश्वर झोरे, गंगाराम कोळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल मुंबई मंडळाचे अध्यक्ष धाकू डोईफोडे, सचिव नवल गावडे यांनी तालुका शाखेचे अभिनंदन केले. तर आशा गवळी कुटुंबाला वीजजोडणीसाठी जमीनमालक रामा हरवळकर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)धनगर समाजोन्नती मंडळाच्या पाठपुराव्यामुळे मिळाली वीजजोडणी.गवळी कुटुंबाला आॅक्टोबर २०१४मध्ये घरगुती वीजप्रकरण मंजूर.गेली तीस वर्षे गवळी कुटुंबिय होते उजेडाच्या प्रतीक्षेत.महावितरण कंपनीकडून केली जात होती चालढकल.गवळी कुटुंबियांनी मानले धनगर समाजोन्नती मंडळाचे आभार.