शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखात बालचित्रपट महोत्सव

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

आॅडियन्स बेस्ट फिल्म पुरस्कार मिळवलेला जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा गरीब कुटुंबातील बहिण-भावांचे नाते, एकमेकांवरचे प्रेम उलगडून दाखवणारा एक भावस्पर्शी चित्रपट

देवरुख : फिल्म सोसायटी, निपाणी आणि देवरुखच्या स्नेह परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत माटे - भोजने सभागृहात बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.लहान वयात पाहायला, ऐकायला, मिळालेल्या चांगल्या, निखळ आनंद देणाऱ्या गोष्टी पुढच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणाऱ्या, ठसा उमटवणाऱ्या ठरतात. माणसाचा चांगूलपणावरील विश्वास वाढवणाऱ्या ठरतात म्हणून असे उद्बोधक चांगले चित्रपट स्नेह परिवार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. एकाच तिकिटात दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये चिल्ड्रेन आॅफ हेवन हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आॅडियन्स बेस्ट फिल्म पुरस्कार मिळवलेला जगप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा एका गरीब कुटुंबातील बहिण-भावांचे नाते, एकमेकांवरचे प्रेम उलगडून दाखवणारा एक अस्वस्थ करणारा भावस्पर्शी चित्रपट खास आकर्षण आहे, तर दुसरा चित्रपट द ब्लॅक स्टॅलियन हा चित्रपट एक लहान मुलगा आणि त्याची घोड्याशी असलेली दोस्ती या कथानकावर आधारित चित्रपट दाखवला जाणार आहे.दोन्ही चित्रपटांच्या प्रवेशिकांसाठी व अधिक माहितीसाठी स्नेह परिवार आणि रुबिना चव्हाण, युयुत्सू आर्ते, प्रमोद हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सहज कळतील, असे संस्कारक्षम बालचित्रपट मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही स्नेह परिवाराने केले आहे. (प्रतिनिधी)