शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

देवगड नळयोजनेची राणेंनी घेतली दखल

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न : शिरगाव पाडाघर येथील योजनेला दिली भेट

शिरगांव : देवगड-जामसंडे पाणी प्रश्न उभा आहे म्हणूनच आमच्या सारख्या वेगळ्या लोकांना जनतेने निवडून दिले आहे. सगळं सुरळीत चाललं असल तर नवीन चेहरे का निवडून दिले असते? आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. वेगळं काहीतरी करुन दाखवेन असे नक्कीच जनतेला वाटतं. म्हणूनच मी इथे उभा आहे. नक्कीच वेगळं काम करुन दाखवेन, असे देवगड कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी शिरगाव पाडाघर येथील देवगड नळयोजनेची पाहणी करताना वक्तव्य केले.पियाळी शिवगंगा नदीवर असलेल्या देवगड प्रादेशिक नळयोजनेच्या अनेक तक्रारींबाबत आमदार नितेश राणे यांनी दखल घेत या नळयोजनेच्या पंपींग स्टेशनला थेट भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी याच नळयोजनेबाबत असलेल्या गावांचा पाणीप्रश्न वेळी वेळोवेळी ऐरणीवर आला आहे. या नळयोजनेतून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिकारी देखभाल दुरुस्तीचे कंत्राटदार यांच्याशी चर्चा करताना आमदार नितेश राणे यांनी खडेबोल सुनावले. यावेळी राणे म्हणाले की, वीज, पाणी या जनतेच्या मुलभूत गरजा आहे. त्या वेळेवर मिळणे गरजेचे आहे. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपल्या समस्या जनतेला सांगून चालणार नाहीत. यावर कायमस्वरुपी तोडगा निघणे गरजेचे आहे. योजनेचे काम दर्जेदार होणे आवश्यक असून जनतेला त्याचा त्रास होता कामा नये. पाणी प्रश्नासंबंधी कोणाचीही गय केली जाणार नाही. अथवा हितसंबंधही जपले जाणार नाहीत. हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याची गरज आहेच. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी टिमवर्क म्हणून काम करणे गरजेचे आहे. एकमेकांशी संवाद व समन्वय साधणे आवश्यक आहे. नळयोजनेला निधी कमी पडणार नाही. अडीअडचणी वेळीच सांगा. त्यावर उपायही करता येतील. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी साटम, सरपंच अमित साटम, पंचायत समिती सदस्य रविंद्र जोगल, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, विभागीय अध्यक्ष पंकज दुखंडे, संदीप साटम, राजेश कदम, कांदाशेठ माळवदे, योगेश चांदोसकर, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, प्रभावी उपअभियंता व्ही. जी. वाळके, शाखा अभियंता टी. एम. शिंदे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश मठकर, उपअभियंता व्ही. जे. कुलकर्णी, विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. जी. पालशेतकर, ग्रामविकास अधिकारी चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)नळयोजनेच्या समस्या- आमदारांच्या सूचनानवीन पंप घेण्यासाठी प्रयत्न करणार.वीज खंडीत वेळेत पाणी उपसा करण्यासाठी पंपींग स्टेशनला आमदार निधीतून जनरेटर देणार.पाणीचोरी प्रश्नी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करुन यावर काय कारवाई करता येईल याबाबत लवकरात लवकर हालचाल करणार.योजना पुर्नजिवीत करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.नळयोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही.या योजनेच्या पुर्नजिवीताबाबत दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.देवगड प्रादेशिक नळयोजना शिरगांव येथे १९७६ पासून कार्यान्वित आहे.पाणी उपसा करणारे पंप जुनेच असल्याने कमी क्षमतेने पाणी उपसा होतो.इंटेक वेल नादुरुस्त स्थितीत आहे.वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पंपींगच्या कामात अडथळे येतात. पाईपलाईन जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण जास्त आहे. पाणी चोरी समस्या गंभीर आहेत. अपुरा कर्मचारी वर्गकायमस्वरुपी शाखा अभियंता नाही. सध्या मालवणचे शाखा अभियंता व्ही. जी. वाळके यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. आमदार कसा आहे हे तरी पहा...अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार राणे म्हणाले, अडीअडचणी असतील तर निसंकोच केव्हाही चर्चा करा. कोणत्याही प्रश्नी योग्य वेळी तुम्ही माझ्याकडे मदत मागितली आणि तर मी मदत करतो की नाही हे अजमावून आमदार कसा आहे हे तुम्ही पहा तरी... पाण्यासारख्या प्रश्नाला नेहमीच प्राधान्य देईन. निधीची अडचण भासणार नाही. ही अडचण सोडविण्याची जबाबदारी माझीच राहील.