शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

देवगड, मालवणला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 23, 2016 01:10 IST

मान्सून सक्रिय : समुद्राला उधाणसदृश परिस्थिती

मालवण/देवगड : सिंधुदुर्ग किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात कोसळल्या. त्यानंतर उशिराने दाखल झालेल्या पावसाची बुधवारी ९१.६७ मिलिमीटरची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३३.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक २५२ मिलिमीटर पाऊस कोसळला, तर मालवण तालुक्यात १४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, समुद्र खवळलेल्या स्थितीत असून, देवगड तालुक्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: देवगडला झोडपून काढले. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भात पेरणीनंतर लावणीच्या प्रतीक्षेत असलेला बळिराजा सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, दूरध्वनी व विद्युत पोल काही गावांमध्ये पडल्यामुळे काही तास विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. मंगळवारी व बुधवारी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मालवण तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ९०५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर सावंतवाडीत सर्वाधिक कमी ४१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत दिवसभरात दोडामार्ग तालुक्यात ८७ मिमी , सावंतवाडी ३८, वेंगुर्ले ६९.४०, कुडाळ ४२, मालवण १४९, कणकवली ६१, देवगड २५२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात १ ते २२ जूनपर्यंत ५१८.२७ मिमीसह ४१४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा भात लागवडीसाठी ६८ हजार क्षेत्राचे उद्दिष्ट आहे; पण दरवर्षी बदलत्या हवामान पावसाच्या लहरीपणामुळे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे चित्र आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भात लागवड क्षेत्र कमी होत आहे. पावसासोबत शेती कामासाठी मजुरांची वानवा जाणवत आहे. (प्रतिनिधी)वीजपुरवठा खंडितदेवगड तालुक्यात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. यामुळे तालुक्यातील पूरळ, गिर्ये, वाघोटण, सौंदाळे, फणसगाव, आदी गावांमधील वीज खांब पडून या गावांमधील काही वाड्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.