शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पर्यटनानेच विकास शक्य

By admin | Updated: September 28, 2016 00:44 IST

खेमसावंत भोसले : माजगाव येथे जागतिक पर्यटन दिन साजरा

सावंतवाडी : पर्यटन क्षेत्राचा ग्रामीण पर्यटन हा मूळ गाभा असून, ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित करून कृषी व ग्राम पर्यटनाचा विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने जिल्हा पर्यटन विकासात आघाडीवर राहील, असे मत राजे खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केले. माजगाव येथे द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजमाता सत्वशीलादेवी भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र फाटक, ‘रात्रीस खेळ चाले’चे दिग्दर्शक राजू सावंत, अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, अध्यक्ष डी. के. सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, भाई देऊलकर, आबा सावंत, नकुल पार्सेकर, बाळासाहेब परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी खेमसावंत भोसले म्हणाले, ग्रामीण विकास हे पर्यटन क्षेत्राचे मूळ आहे. पर्यटनाचा विकास हा गावातूनच झाला पाहिजे. तरच नवनवीन पर्यटन क्षेत्रे तयार होतील. रोजगारांची साधने उपलब्ध होणार असून, ‘मामाचा गाव’ हा खरा चांगला उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. गावातील रस्ते चांगले असतील तरच पर्यटक येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ४0 रिक्षास्वारांचा सत्कारअध्यक्ष डी. के. सावंत म्हणाले, २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. मात्र, त्याचा प्रत्यक्षात आराखडाच कुठे दिसत नाही. आजही महत्त्वाच्या ठिकाणी शौचालये नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीतील ४० रिक्षास्वारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)‘रात्रीस खेळ चाले’मुळे रोजगार मिळाला : प्रल्हाद कुडतरकरअभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ््या चित्रपटांचे, तसेच मालिकांचे चित्रीकरण झाले, तर मोठ्या प्रमाणात अनेक कलाकार जिल्ह्यात येतील. त्यामुळे येथील पर्यटनाची सर्वांना माहिती होईल. आपण ते करणे गरजेचे आहे. येथील पर्यटनाला लागणाऱ्या सुविधा चांगल्या ठेवल्या, तर गावातही चित्रीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले. ‘रात्रीस खेळ चाले’मुळे अनेकांना रोजगार मिळाला. तसेच या मालिकेमुळे सर्वांना सिंधुदुर्गबद्दल एक वेगळी छाप पडली. त्याचा फायदाही येथील लोकांना होईल. अनेक पर्यटक भविष्यात सिंधुदुर्गमध्ये येतील, असेही यावेळी कुडतरकर म्हणाले.