शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन प्रकल्पांचा ‘लघु’ महामंडळामार्फत विकास

By admin | Updated: July 10, 2016 23:54 IST

दीपक केसरकर : शिल्पग्राम, रघुनाथ मार्केटचा प्रश्न निकाली

सावंतवाडी : शिल्पग्राम व रघुनाथ मार्केट हे प्रकल्प लवकरच महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार असून, त्याअंतर्गत त्यांचा विकास होणार आहे. दोन महिन्यात हे प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती अर्थ व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे कित्येक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पांना ऊर्जितावस्था येणार असून, पर्यटनासह येथील बाजारपेठेचे महत्त्व वाढणार आहे. उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम या दोन्ही प्रकल्पांची केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाच्या सहाय्यक व्यवस्थापिका आर. के. विमला, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रकाश परब, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर यांनी दोन्ही प्रकल्पांची पाहणी केली तसेच महामंडळाच्या व्यवस्थापिका आर. के. विमला यांना प्रकल्पविषयी व आजुबाजूच्या परिसरातील सविस्तर माहिती दिली. सावंतवाडीत केरळच्या धर्तीवर क्वॉयर प्रकल्प राबविण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या विविध हस्तकला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच महिलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना केरळसारखी आवश्यक बाजारपेठही मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, महिलांनी त्याचा लाभ उठविण्याचे आवाहनही केसरकर यांनी केले. रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम पुन्हा विकसित होण्यासाठी हे प्रकल्प महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर या प्रकल्पांचा विकास होणार आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आत गणेश चतुर्थीपूर्वी दोन्ही प्रकल्प सुरु होणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी संगितले. रघुनाथ मार्केटचा जेव्हा विकास होईल त्यावेळी सावंतवाडी सुजलाम सुफलाम होईल, असा आशावादही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. आर. के. विमला म्हणाल्या, केरळमध्ये काथ्या प्रकल्पाचे ७३४८ युनीट आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा पंधरापेक्षा वर गेला नाही. जिल्ह्यात केवळ आणि केवळ हे दोनच युनीट आहेत. त्यामुळे काथ्या व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळू शकते. सध्या केरळसारख्या मोठ्या बाजारपेठेत काथ्याची मागणी होत असून, त्यासाठी काथ्या निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महिलांनी याचा लाभ घेत घरबसल्या प्रगती करावी. शिवाय या प्रकल्पांसाठी आवश्यक असे प्रशिक्षण येत्या पंधरवड्यात देण्यात येणार असून त्याचाही लाभ महिलांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिल्पग्रामसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करून पालकमंत्र्यांनी शहराच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. आगामी काळात शहरात अनेक विकासात्मक प्रकल्पातून शहराचा सर्वांगिण विकास होणार असून सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे, असे सांगितले. यावेळी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका अनारोजीन लोबो यांचे पती जॉन लोबो यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना पालकमंत्री दीपक केसरकरांसह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. (वार्ताहर) प्रकल्पांना ऊर्जितावस्थ : पर्यटनाला संधी मिळणार सावंतवाडी शहरात पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत अनेक प्रकल्प बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शहराच्या पर्यटनावर परिणाम झाला होता. मात्र, एकंदरित आजच्या निर्णयामुळे रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम दोन्ही प्रकल्पांना ऊर्जितावस्था मिळणार असल्याने पर्यटनाला संधी निर्माण झाली आहे. पाच कोटीची मंजुरी महिलांना लघु उद्योग विकास महामंडळामार्फत रोजगारासाठी चांदा ते बांदाच्या योजनेतून पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. याअतंर्गत सुरूवातीला सावंतवाडी शहरातील किमान ५० महिलांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर वेंगुर्ले व दोडामार्गात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.