शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तोतया पोलीस अधिकाऱ्याला पकडले

By admin | Updated: November 27, 2015 00:12 IST

सायबर कॅफे चालकाची फसवणूक : आठ दिवसांपासून आहे मालवणात

मालवण : ‘पोलीस अधिकारी आहे’ अशी बतावणी करून मालवण शहरातील एका सायबर कॅफे चालकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पंकज रवींद्र्र प्रभू (३०, रा. काळसे-धामापूर) याला मालवण पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. मालवण एसटी स्थानकानजीक सिताई कॉम्प्लेक्स मधील योगक्षेम ट्रेडर्सचे मालक योगेश पटकारे यांनी या प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली असून संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्थानकाचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीप्रसंगी पंकज याने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पटकारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंकज प्रभू हा आठ दिवसांपूर्वी मालवण येथे आला. त्याने सिताई कॉम्प्लेक्स येथील योगेश पटकारे यांच्या सायबर कॅफेमध्ये येत आपण पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आहोत. जिल्हा पोलीस दलात आपण रुजू झालो आहोत. तसेच दोडामार्ग येथे कार्यरत आहोत. एक डिसेंबरपासून मालवण पोलीस ठाण्यात आपण रुजू होणार आहे. असे सांगून आपल्याला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याची परीक्षा द्यावयाची आहे. त्यासाठी आपल्या कॅफेत इंटरनेटचा वापर करण्याची परवानगी मागितली. मालक पटकारे यांनी ही व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याने त्याला सहकार्याच्या भावनेतून विश्वास ठेवला. तो गेले आठ दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात योगक्षेम ट्रेडर्स कॅफेमध्ये संगणकाचा वापर करायचा. यावेळी प्रभू यांनी आपण पोलीस अधिकारी आहोत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे गोपनीय काम करत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)उलट तपासणी : खाकीचा दम मिळताच कबुलीगुरुवारी दुपारी ३ वाजता पोलीस स्थानकाचे गोपनीय पोलीस कर्मचारी रुपेश सारंग हे सायबर कॅफे तपासणीसाठी योगक्षेम ट्रेडर्स येथे आले. यावेळी त्यांनी चौकशी केली असता या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर सारंग यांनी त्याची उलटतपासणी करत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी प्रभू हा तोतया पोलीस असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसी खाकीचा दम मिळताच त्याने आपण पोलीस नाही. एका कंपनीत आहोत, धामापूर येथे घर आहे. मात्र, त्या माहितीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता त्यातही सत्यता आढळून आली. त्यानंतर पटकारे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.