शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:07 IST

माझ्यावर रडीचा डाव खेळल्याचे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, असा गौप्यस्फोट पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पाल येथे केला.

ठळक मुद्देईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविलादीपक केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप : पाल येथे शिवसेनेचा मेळावा

वेंगुर्ला : माझ्यावर रडीचा डाव खेळल्याचे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, असा गौप्यस्फोट पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पाल येथे केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाल येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते. या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, नगरसेवक संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, संजय गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले की, आपण कोणाला त्रास दिला नाही आणि देणार नाही. परंतु आमच्या लोकांना त्रास दिला, तर कोणाला सोडणार नाही. माझ्यावर तेलींनी रडीचा डाव खेळल्याचा आरोप केला होता. परंतु त्यांनी स्वत: मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीकडून आलेल्या नोटिसीची माहिती लपविली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशाप्रकारे गंभीर केस असलेल्या उमेदवारांना येथून हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग